पोलिस ठाण्यात उपस्थित असलेल्या अधिकारी आणि कर्मचारी यांनी नाणेकर यांना जवळच्या खासगी रुग्णालयात नेले. नाणेकर यांच्यावर उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.
नालासोपाऱ्यात विहिरीत सापडले मानवी शीर
नालासोपाऱ्यातील एका विहिरीत मंगळवारी दुपारी एका व्यक्तीचे शीर सापडले. याप्रकरणी नालासोपारा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सायंकाळी उशिरापर्यंत सुरू होती. नालासोपारा येथील गास टाकी पाडा गावातील विहीर स्वच्छ करण्याचे काम ग्रामस्थांतर्फे सुरू होते. तेव्हा एका पांढऱ्या रंगाच्या पिशवीत मानवी शीराचा सांगाडा ग्रामस्थांना सापडला. ग्रामस्थांनी तत्काळ नालासोपारा पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून हे शीर ताब्यात घेतले असून तपास सुरू केला आहे. वसईत याआधी भुईगाव समुद्रकिनारी एका महिलेचा शीर नसलेला मृतदेह सापडला होता. त्या खुनाच्या गुन्ह्याची उकल करण्यात वसई पोलिसांना तब्ब्ल १३ महिन्यांनी यश आले होते. त्यामुळे आता केवळ शीर सापडल्याने उर्वरित मृतदेह शोधण्याचे मोठे आव्हान नालासोपारा पोलिसांपुढे आहे.