• Sat. Sep 21st, 2024

राष्ट्रवादीच्या २३ वर्षांच्या सत्तेला सुरुंग, दौंडमध्ये भाजपचा झेंडा, राहुल कुल यांची सरशी

राष्ट्रवादीच्या २३ वर्षांच्या सत्तेला सुरुंग, दौंडमध्ये भाजपचा झेंडा, राहुल कुल यांची सरशी

दौंड, पुणे : दौंड कृषी उत्पन्न बाजार समितीवर संस्था स्थापनेच्या इतिहासापासून पहिल्यांदाच भाजपने झेंडा फडकवला आहे. त्यामुळे दौंडचे आमदार राहुल कुल यांचे वजन वाढले आहे. कृषी उत्पन्न बाजार समितीच्या अध्यक्षपदी भाजपचे गणेश जगदाळे आणि उपाध्यक्षपदी शरद कोळपे विजयी झाले आहेत. त्यामुळे गेल्या २३ वर्षांपासून राष्ट्रवादीचे नेते रमेश थोरात यांच्या प्रतिष्ठेला सुरुंग लागला आहे.बारामती लोकसभा मतदारसंघात भाजपने लक्ष घालण्यास सुरुवात केल्यापासून भाजपची घोडदौड पाहायला मिळत आहे. जेव्हापासून समितीची स्थापना झाली तेव्हापासून भाजपला आपला झेंडा रोवता आला नव्हता. मात्र आता अध्यक्ष आणि उपाध्यक्षही भाजपचे झाले आहेत. त्यामुळे दौंड तालुक्यात राहुल कुल यांचे वजन वाढत असल्याची चर्चा आता सुरू झाली आहे.

काँग्रेसचा संचालक फोडला, ‘नऊ’चे दहा करुन भाजप-शिवसेना-राष्ट्रवादी सत्तेत
नुकत्याच झालेल्या निवडणुकीमध्ये १८ संचालकांमधून राष्ट्रवादी व भाजपाचे प्रत्येकी ९-९ सदस्य निवडून आले होते. मात्र एका आठवड्यापूर्वी राष्ट्रवादीचे नवनिर्वाचित संचालक संपत निंबाळकर यांचे निधन झाल्याने राष्ट्रवादीची १ जागा कमी झाली होती. त्यामुळे आज पुन्हा निवडणूक घेण्यात आली.

वडील पवारांच्या पाठिशी उभा राहिले, पण मुलगा पवारांनाच नडून आमदार झाला

यात भाजपाचे गणेश जगदाळे यांच्या विरोधात राष्ट्रवादीचे बाळासाहेब शिंदे तर शरद कोळपे यांच्या विरोधात राष्ट्रवादीच्या वर्षां मोरे यांच्यामध्ये यांनी अर्ज दाखल केले होते. मात्र यामध्ये भाजपाचे गणेश जगदाळे आणि शरद कोळपे यांना प्रत्येकी ९ मते पडली तर राष्ट्रवादीच्या उमेदवारांना प्रत्येकी आठ मते पडली. त्यामुळे निवडणूक निर्णय अधिकारी हर्षित तावरे यांनी जगदाळे व शरद कोळपे यांना विजयी घोषित केले.

भरत जाधवजी, माफी मागताना प्रेक्षकांचे काही पैसे परत केलेत का? उदय सामंत यांचा टोला
या विजयामुळे भाजपने इतिहासात पहिल्यांदा आपली सत्ता दौंड कृषी उत्पन्न बाजार समितीवर मिळवली आहे. यावेळी आमदार राहुल कुल यांनी स्वतः उपस्थित राहून नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा सत्कार केला. गेल्या २३ वर्षांच्या इतिहासामध्ये आमदार कुल यांनी पहिल्यांदाच दौंड बाजार समितीमध्ये शिरकाव केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed