राज्यात करोना रुग्णांचे प्रमाण पुन्हा वाढत आहे. मुंबईत करोनाग्रस्त रुग्ण दररोज आढळून येत आहेत. मंगळवारी राज्यातील ३९ पैकी १६ करोनाग्रस्त मुंबईतील रहिवासी आहेत. जानेवारी महिन्यापासून राज्यातील १२० करोनाबळींपैकी २६ एकट्या मुंबईतील आहेत.
कोव्हिडला कारणीभूत ठरणाऱ्या SARS-CoV-2 विषाणूच्या कचाट्यातून जगभरातील बहुतांश लहान मुलांची सुटका झाली होती. २०२० पासून जगभरातील सुमारे ७० लाख करोनामृत्यूंपैकी ‘शून्य ते २० वर्ष वयोगटातील १ टक्क्यापेक्षा कमी जणांचा समावेश होता.
याआधी जुलै २०२२ मध्ये मुंबईत करोनामुळे डाउन सिंड्रोम आणि हृदयविकाराने ग्रस्त नऊ महिन्यांच्या मुलीचा मृत्यू झाल्याचे समोर आले होते.
पुण्याच्या आरोग्य अधिकार्यांनी जुलै २०२० मध्ये आठ दिवसांच्या मुलीचा करोनाने मृत्यू झाल्याची नोंद केली होती. देशाच्या इतर भागांतूनही कोविडमुळे नवजात अर्भकांचा मृत्यू झाल्याच्या काही घटना समोर आल्या आहेत.
करोनाबळींमुळे कोव्हिड नाहीसा झाला नसल्याचे पुन्हा अधोरेखित होत आहे. ताप आल्यास स्वत:च औषधोपचार करणे चांगले नाही, वैद्यकीय सल्ला घेणे आवश्यक आहे, असे सर एच एन रिलायन्स हॉस्पिटल, गिरगावचे डॉ राहुल पंडित यांनी सांगितले. तर दुसरीकडे सध्या राज्यात १४२ सक्रिय प्रकरणांपैकी १९ रुग्ण उपचार घेत आहेत आहेत.
दरम्यान, राज्यात ३९ नवीन करोना रुग्ण आढळून आले आहेत. यात एक दिलासादायक बातमी म्हणजे मुंबई सोडल्यास राज्यात इतर कोणत्याही ठिकाणी एकाही रुग्णाचा मृत्यू झालेला नाही. राज्यभरात एकूण ४५५ सक्रिय रुग्ण आहेत. त्यातील ३५ रुग्ण रुग्णालयात दाखल आहेत.