• Mon. Jul 27th, 2026

    राज्यपाल रमेश बैस यांनी घेतले श्री क्षेत्र महाबळेश्वरचे दर्शन

    ByMH LIVE NEWS

    May 24, 2023
    राज्यपाल रमेश बैस यांनी घेतले श्री क्षेत्र महाबळेश्वरचे दर्शन

    सातारा, दि. २४ : राज्यपाल रमेश बैस यांनी आज सहकुटुंब श्री क्षेत्र महाबळेश्वरचे दर्शन घेतले.

    यावेळी राज्यपालांचे प्रधान सचिव संतोष कुमार, विशेष कार्य अधिकारी महेश गोलाणी, अपर जिल्हाधिकारी तथा राज्यपालांचे परिवार प्रबंधक अरुण आनंदकर, प्रांताधिकारी राजेंद्र जाधव, तहसीलदार तेजस्विनी पाटील आदी उपस्थित होते.

    यावेळी राज्यपाल श्री. बैस यांनी पंचगंगा मंदिर दर्शन घेऊन कृष्णा, वेण्णा, कोयना, सावित्री व गायत्री नदीच्या उगमस्थानास भेट दिली. तसेच श्री महाबळेश्वरची अभिषेक पूजा केली. त्यानंतर कृष्णाई मंदिरास भेट देऊन तेथील इतिहास जाणून घेतला.

    ०००००

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed