• Sat. Sep 21st, 2024

PSI चा हात धरला अन्…! गुन्ह्याची चौकशी करताच आरोपीने केलं भयानक कृत्य, संपूर्ण पोलीस स्टेशन हादरलं…

PSI चा हात धरला अन्…! गुन्ह्याची चौकशी करताच आरोपीने केलं भयानक कृत्य, संपूर्ण पोलीस स्टेशन हादरलं…

अमरावती : एका गुन्ह्यात तपासकामी आलेल्या पोलीस अधिकाऱ्याला चावा घेऊन पथकासोबत धक्काबुक्की करण्यात आली. शिवीगाळकरून शासकीय कामकाजात अडथळा निर्माण करण्यात आला. ही घटना मोर्शी ठाण्याच्या हद्दीतील येरला येथे घडली. या प्रकरणी चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.मिळालेल्या माहितीनुसार, अनंत साहेबराव पांडे, साहेबराव पांडे व दोन महिला सर्व रा. येरला अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. वर्धा शहर पोलीस ठाण्यात फसवणुकीचा एक गुन्हा दाखल आहे. त्याचा तपास साहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश सुधाकर बैरागी (३७) यांच्याकडे आहे. त्या गुन्ह्यातील तपासादरम्यान संशयित आरोपी म्हणून अनंत पांडे याचे नाव समोर आले. त्यामुळे त्याला तपासकामी ताब्यात घेण्यासाठी गणेश बैरागी व त्यांच्या पथकातील अन्य अंमलदार सायंकाळी येरला येथे पोहोचले.

Shocking News: महिलेने लावलं टोमॅटोचं झाड, सकाळी पाहताच उगवले कंडोम; सत्य कळताच खूप वैतागली
याबाबत मोर्शी पोलिसांना देखील पूर्वसूचना देण्यात आली होती. गणेश बैरागी व मोर्शी पोलिसांना आरोपी अनंत पांडे हा घरी मिळून आला. त्यावर गणेश बैरागी यांनी त्याच्याविरुद्ध दाखल गुन्ह्याची माहिती दिली तथा आमच्यासोबत चल, अशी सूचना त्याला केली. मात्र, पोलिसांसोबत न जाता अनंत पांडे याने गणेश बैरागी यांना शिवीगाळ केली. तसेच त्यांच्या उजव्या हाताला चावा घेतला. तर त्याच्यासह साहेबराव पांडे व दोन महिला यांनी पोलीस पथकाशी धक्काबुक्की केली. सरकारी कामात अडथळा निर्माण केला. या प्रकरणी गणेश बैरागी यांनी मोर्शी ठाण्यात तक्रार दाखल केली. तक्रारीवरून पोलिसांनी चौघांविरुद्ध गुन्हा दाखल केला.

Liquor Death : दारूच्या घोटाने जीव घेतला, ३ महिलांसह १० जणांचा भयंकर अंत; अख्खं शहर हादरलं…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed