• Mon. Nov 25th, 2024
    लवकरच मी लग्न करणार, माझ्या लग्नातही राडा करा, धुडगूस  घाला: गौतमी पाटील

    बारामती : सध्या माझ्या कार्यक्रमांना तुफान प्रतिसाद मिळतोय. जाईल तिथे लोक माझ्या कलेला खूप चांगला प्रतिसाद देतायेत. माता-माऊल्यांचं प्रेम मिळतंय. तरुण गर्दी करतायेत. अशात तर लग्नाचा विचार नाहीये. पण अनुरुप मुलगा मिळाला की मी लग्न करेन. जसा कार्यक्रमात राडा करता तसा लग्नातही राडा करा, असं गौतमी पाटील हसत हसत म्हणाली. बारामती येथे कार्यक्रमानंतर गौतमी पाटील माध्यमांशी बोलत होती.बारामती तालुक्यातील माळेगाव येथील येळेढाळे वस्तीत श्री लक्ष्मीआई यात्रेच्या निमित्ताने गौतमी पाटील यांच्या ऑर्केस्ट्राचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. नृत्यांगना गौतमी पाटील यांच्या ऑर्केस्ट्राचे उद्घाटन जिल्हा बँक संचालक दत्तात्रय येळे यांनी केले. यात्रा कमिटीने केलेले चोख नियोजन, त्यास पोलिस निरीक्षक किरण अवचर व सहकारी पोलिसांनी ठेवलेला बंदोबस्त यामुळे नेहमी गोंधळ व राडा होणारा कार्यक्रम शांतपणे पार पडला. यावेळी दहा हजारांहून अधिक जनसमुदाय उपस्थित होता. विशेषतः महिलांची संख्या अधिक होती.

    सरकार तुम्ही केलंय मार्केट जाम, पाव्हणं जेवला का, बाई मी ऐवज हवाली केला, पाटलांचा बैलगाडा, या गाण्यांसह थेट महिला वर्गासमोर जाऊन गौतमी पाटील यांनी केलेल्या नाचकामाला उस्फुर्त प्रतिसाद मिळाला. गौतमीच्या कार्यक्रमाचा तरुणांनी विशेष आनंद लुटला.

    मागील एका मुलाखतीत आपण लग्न करणार असल्याचं म्हटलं होतं. आपण कधी लग्न करणार आहात? असा प्रश्न पत्रकारांनी विचारला. त्यावर गौतमी म्हणाली, सध्या तरी माझा लग्नाचा विचार नाही. पण लवकरच मी लग्न करेन. तुम्हा सगळ्यांना लग्नाचं निमंत्रण देईन. जसं माझ्या कार्यक्रमात राडा करता, तसा माझ्या लग्नातही धुडगूस घाला, असं कोपरखळी गौतमीने हसत हसत मारली.

    बारामतीमधील कार्यक्रम यशस्वी पार पाडण्यासाठी यात्रा कमिटीमधील अध्यक्ष राजेश येळे, सचिन माने, सत्यजित ढाळे, भिकाजी नांगरे, संदीप येळे, बंडू नाना, सतीश शेंडगे, जगन करे, मल्हार वावरे, विठ्ठल ढाळे यांसह ग्रामस्थ व स्वयंसेवकांनी मोलाचे सहकार्य केले.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed