सुशील राऊत, छत्रपती संभाजीनगर : पदरात पाच महिन्यांची मुलगी आणि पाच वर्षांचा मुलगा. अशा परिस्थितीत सेवानिवृत्त पोलीसाच्या सुनेचा संशयास्पद मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना साताऱ्यातील सुधाकर नगर मध्ये घडली. विवाहितेच्या अंगावर, चेहऱ्यावर मारहाणीचे व्रण देखील आढळून आले असून तोंडातून रक्तस्त्राव झाला आहे. त्यामुळे तिचा खून झाल्याचा दाट संशय तिच्या माहेरच्यांनी व्यक्त केला आहे.सुवर्णा अंकुश बनकर असे मृत महिलेचे नाव आहे. मूळ छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात खुलताबाद तालुक्यातील रहिवासी असलेल्या २४ वर्षीय सुवर्णा यांचा सात वर्षांपूर्वी अंकुश सोबत विवाह झाला होता. त्यानंतर त्यांना एक मुलगा झाला. तर पाच महिन्यांपूर्वीच सुवर्णा यांनी एका मुलीला जन्म दिला होता.
गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या कुटुंबात वाद सुरू होता. गुरुवारी अचानक त्यांच्या माहेरच्या मंडळींना सुवर्णा यांना रुग्णालयात दाखल केल्याचे कळवण्यात आले. त्यानंतर नातेवाईक दाखल होईपर्यंत अडीच वाजता मात्र डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषित केले.
गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या कुटुंबात वाद सुरू होता. गुरुवारी अचानक त्यांच्या माहेरच्या मंडळींना सुवर्णा यांना रुग्णालयात दाखल केल्याचे कळवण्यात आले. त्यानंतर नातेवाईक दाखल होईपर्यंत अडीच वाजता मात्र डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषित केले.
नातेवाईकांनी मात्र, सुवर्णा यांना घरी गंभीर मारहाण झाली असून त्यांच्या अंगावर व्रण असून त्यातच त्यांचा मृत्यू झाल्याचा आरोप केला. शिवाय,आरोपींवर गुन्हा दाखल करून अटक करण्यासाठी त्यांनी ठाण्यात धाव घेतली होती.
दरम्यान, १२ मे रोजी सुवर्णा बनकर यांचा मृत्यू झाला. त्यानंतर आक्रमक नातेवाईक सातारा ठाण्यात गेले. त्यांनी खुनाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. पोलिस निरीक्षक प्रशांत पोतदार यांनी शवविच्छेदन अहवालानंतर निर्णय घेऊ, असे कळविले. या प्रकरणी आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. अधिक तपास उपनिरीक्षक देविदास शेवाळे करीत आहेत.