ऑर्डर कशी कराल?
‘ओएनडीसी’चे अॅप उपलब्ध नाही. त्यावरून ऑर्डर करण्यासाठी त्यांच्याच भागीदाराचे अॅप वापरता येणार आहे. ओएनडीसी’वर खाद्यपदार्थांची ऑर्डर करण्यासाठी ‘पेटीएम’ आणि ‘मॅजिकपिन’ या अॅपची मदत घेता येईल. याशिवाय ‘मायस्टोअर’, ‘बायर’ आणि ‘फोनपे’ आदींवरून ऑर्डर करता येणार आहे.
‘पेटीएम’वरून कशी ऑर्डर कराल?
– सर्वप्रथम पेटीएम अॅप उघडा.
– होम पेजवर खाली ऑर्डर फूड अँड ग्रोसरी असा पर्याय दिसेल. तिथे क्लिक करून ऑर्डर मागवता येईल.
– याशिवाय थेट ओएनडीसीचा पर्याय शोधून फूड अँड ग्रोसरीचा पर्याय दिसेल. त्याला क्लिक केले असता हॉटेल आणि खाद्यपदार्थांची यादी दिसण्यास सुरू होईल.
‘मॅजिकपिन’वरून ऑर्डर कशी कराल?
– पेटीएमव्यतिरिक्त मॅजिकपिनवरूनही खाद्यपदार्थ मागवता येणार आहेत.
– मॅजिकपिनचे अॅप डाउनलाउड केल्यावर फूड ऑप्शन सिलेक्टचा पर्याय निवडा.
– त्यानंतर मागणी नोंदवता येईल आणि पैसे भरता येतील.
ऑर्डरचे ट्रॅकिंग होणार
सध्या उपलब्ध असणाऱ्या अन्य फूड डिलिव्हरी अॅपप्रमाणे ‘मॅजिकपिन’ वा ‘पेटीएम’वरून करण्यात येणाऱ्या ऑर्डरचे ट्रॅकिंग करता येणार आहे.
किमतीत किती फरक पडेल?
नवी दिल्लीत ‘ओएनडीसी’ प्लॅटफॉर्मवरून पिझ्झाची ऑर्डर नोंदवली असता, तो २०९ रुपयांत घरपोच मिळाला. मात्र, तोच पिझ्झा ‘स्वीगी’वरून २६६ रुपयांत मिळाला. याचा अर्थ ‘ओएनडीसी’वरून ऑर्डर नोंदवली असता २७ टक्क्यांची बचत झाली.
मुंबईत ‘वायू’ अॅप सुरू
चित्रपट अभिनेते आणि हॉटेल व्यावसायिक सुनील शेट्टी यांनी ‘स्विगी’, ‘झोमॅटो’ला टक्कर देण्यासाठी ‘वायू’ हे नवे फूड डिलिव्हरी अॅप सादर केले. या अॅपद्वारे रेस्तराँ आणि हॉटेलकडून पदार्थांच्या डिलिव्हरीसाठी कोणतेही कमिशन घेण्यात येणार नाही. अनिरुद्ध कोटगिरे आणि मंदार लांडे यांनी ‘वायू’ची निर्मिती केली आहे. सध्या या अॅपची सेवा केवळ मुंबईपुरती मर्यादित आहे. या अॅपवर सध्या मुंबईतील अनेक मोठ्या आणि प्रसिद्ध हॉटेलचा समावेश करण्यात आला आहे. ‘वायू’ला मुंबईतील ‘हॉटेल अँड रेस्तराँ असोसिएशन’ने पाठिंबा दर्शवला आहे. मुंबई महानगरपालिकेची हद्द, मिरा भाइंदर, नवी मुंबई, ठाणे आणि पालघरमधील बहुतांश हॉटेलचा या अॅपवर समावेश करण्यात आला आहे. सध्या या अॅपवर १५००हून अधिक रेस्तराँची नोंद झाली असून, २५ हजार जणांनी ते डाउनलोडही केले आहे. मुंबईपाठोपाठ देशातील अन्य महानगरे आणि छोट्या शहरांमध्ये ‘वायू’ची सेवा देण्याचा विचार असल्याचे शेट्टी यांनी नमूद केले. स्वतः शेट्टी ‘वायू’चे ब्रँड अॅम्बेसेडर आणि मुख्य गुंतवणूकदारही आहेत. ‘वायू’कडून हॉटेल आणि रेस्तराँकडून दरमहा १००० रुपयांचे शुल्क घेणार आहे. सेवेच्या विस्तारासाठी केंद्र सरकार पुरस्कृत ‘ओपन नेटवर्क फॉर डिजिटल कॉमर्स’ अर्थात ‘ओएनडीसी’शी सहकार्य करण्याचाही ‘वायू’चा विचार असल्याचे शेट्टी यांनी नमूद केले.