• Mon. Nov 25th, 2024
    गर्भवती प्राध्यापिकेने आयुष्य संपवलं, पतीच्या व्हॉट्सअप चॅटमुळे अनैतिक संबंध कोर्टात उघड

    सुशील राऊत, छत्रपती संभाजीनगर : शहरातील नामांकित एमआयटी महाविद्यालयात प्राध्यापिका असलेल्या वर्षा दिपक नागलोत (वय २९ वर्ष) यांनी सासरच्यांकडून पैशांसाठी होत असलेला छळ व पतीच्या विवाहबाह्य संबंधाला कंटाळून ३ फेब्रुवारी रोजी आत्महत्या केली होती. यात त्यांचा पती दीपक तेव्हापासून अटकेत आहे. त्याने न्यायालयात जामिनासाठी याचिका दाखल केली होती. मात्र, वर्षा यांच्या माहेरच्यांकडून घेतलेल्या पैशांचे पुरावे, विवाबाह्य संबंध व त्या प्रेयसीला दिलेला छळाची गंभीर दखल घेत न्यायालयाने गुन्ह्यात दोषारापपत्र दाखल झाल्यानंतरही दीपकचा जामीन नाकारला.आत्महत्या केली तेव्हा वर्षा सात महिन्याच्या गर्भवती होत्या. त्यांच्या आत्महत्येप्रकरणी पती दीपक (३२) सह सासरा राजाराम नागलोत (६०), सासू देविका (५५), नणंद वैशाली (२५, सर्व रा. गजानन कॉलनी) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. प्रेमविवाह करुनही दीपक व त्याच्या वडिलांनी वर्षा यांच्या माहेरच्यांना सातत्याने पैशांची मागणी करत लाखो रुपये घेतले. त्यानंतरही दीपकचे विवाहबाह्य संबंध सुरू झाले. त्यातून त्याने वर्षा यांचा छळ सुरू केला होता.

    दुर्दैवी! सायन-पनवेल हायवेवर २०१७ मध्ये अपघातात जखमी; ६ वर्षांनंतर त्याच जागी तरुणाचा बळी

    व्हॉट्सऍप चॅटिंग मधून दीपकची विकृती स्पष्ट

    वर्षा यांच्या आत्महत्येच्या दिवशी दीपकला पुंडलिकनगर पोलिसांनी अटक केली. पोलिसांनी तपास पूर्ण करुन दोषारोपपत्र देखील दाखल केले. अटकेपासून तो जामिनासाठी प्रयत्न करत आहे. वर्षा यांच्या माहेरच्यांच्या बाजुने ऍड. प्रशांत नागरगोजे, विष्णु नरके यांनी बाजू मांडत जामिनाला विरोध केला.

    १५ वर्षीय चिमुकल्याच्या हत्येचा बनाव रचला, रागाच्या भरात ओढणीने मृतदेह झाडाला टांगला!

    पैसे घेतल्याच्या पुराव्यांसह त्याची प्रेयसीसोबतचा संवादाचे सबळ पुरावेच नागरगोजे यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून देत त्याच्या छळाचा पाढाच त्यांनी वाचला. त्यानंतर सत्र न्यायाधीश न्या. वर्षा पारगावंकर यांनी त्याचा जामिन फेटाळून लावला. विशेष म्हणजे, अर्जदारासारखी व्यक्ती समाजासाठी धोकेदायक आहे, अशी गंभीर टिप्पणी देखील न्यायालयाने केली.

    पदरात पाच महिन्यांची लेक, निवृत्त पोलिसाच्या सुनेचा गूढ मृत्यू, माहेरच्या मंडळींना संशय

    माहेरच्यांकडून घेतलेले पैसे हुंडा म्हणूनच ग्राह्य

    न्यायालयाने जामीन नाकारताना आरोपी पक्ष माहेरच्यांकडून आरोपींच्या खात्यावर आलेले लाखो रुपये का घेतले हे सांगण्यात कमी पडला. त्यामुळे तो हुंडा म्हणूनच धरल्याचे ऍड. नागरगोजे यांनी सांगितले. आरोपींनी सातत्याने साक्षीदारांवर दबाव टाकला. त्यात दोन स्वतंत्र दोन गुन्हे दाखल झाले. त्याची न्यायालयाने गंभीर दखल घेतली. प्रेयसीने देखील त्याच्या त्रासा विरोधाात चिकलठाणा पोलिसांकडे तक्रार दाखल केली. त्याची देखील न्यायालयाने दखल घेतली.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *