नागपूर : मुका-बहिरा असल्याचे भासवून चोरी करणाऱ्या तामिळनाडूच्या टोळीतील एका सदस्याला कोतवाली पोलिसांनी अटक केली. सुप्पारेड्डी व्यंकटस्वामी (वय ४३,रा.वेल्लूर, तमिळनाड़ू), असे अटकेतील चोरट्याचे नाव आहे.काही दिवसांपूर्वी सेंट्रल एव्हेन्यू येथील वरुण शर्मा (वय ३८) हे दुकानात होते. त्यांनी सोन्याची ४५ हजार रुपये किमतीची अंगठी काढून काऊंटरवर ठेवली. याचदरम्यान एक युवक तेथे आला. मुका व बहिरा असल्याचे भासवून त्याने कागद पुढे केला. इशाऱ्याने वरुण यांना देणगी मागितली. वरुण यांनी देणगी देण्यास नकार दिला. संधी साधून युवकाने त्यांची अंगठी चोरी केली व तेथून पसार झाला.
अंगठी न दिसल्याने वरुण यांनी सीसीटीव्हीची पाहणी केली. युवकाने अंगठी चोरी केल्याचे त्यांना दिसले. वरिष्ठ पोलिस निरीक्षक मुकूंद ठाकरे, उपनिरीक्षक नवनाथ देवकाते, हेडकॉन्स्टेबल वामन ठोंबरे, रविकांत काठे, शिपाई पंकज बोंदरे, प्रसन्ना दापूरकर, सागर सगदेव, विशाल पांडे, आशिष पवार, उमेश कुलसंगे, चेतन उतखेडे व अमित तिवारी यांनी सीसीटीव्ही फुटेजद्वारे शोध घेऊन सुप्पारेड्डीला अटक केली.

त्याची पोलिस कोठडी घेतली. तो मुका- बहिरा असल्याचे नाटक करायला लागला. पोलिसांनी त्याची वैद्यकीय तपासणी केली. तो मुका बहिरा नसल्याचे स्पष्ट झाले. पोलिस खाक्या दाखवताच पाच दिवसांनी सुप्पारेड्डी पोपटा सारखा बोलावया लागला. अंगठी साथीदारांना दिली असून ते वेल्लूरला गेल्याचे सुप्पारेड्डीने पोलिसांना सांगितले. पोलिसांचे एक पथक वेल्लूरकडे रवाना झाले.