• Mon. Nov 25th, 2024

    सत्तासंघर्षाचा निकाल लागला, अजित पवारांचा मिश्किलपणा कायम, म्हणाले, मी दिल्लीला…!

    सत्तासंघर्षाचा निकाल लागला, अजित पवारांचा मिश्किलपणा कायम, म्हणाले, मी दिल्लीला…!

    पुणे : महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाचा निकाल सुप्रीम कोर्टाने दिला आहे. या निकालावर विधानसभेचे विरोधीपक्षनेते अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली. सुप्रीम कोर्टाचा निकाल आला आहे. मी माहिती घेतो, मला निकाल पत्र वाचण्यास वेळ मिळाला नाही. त्यामुळे मी बोलणार नाही. मी त्यावर उद्या बोलेल फक्त मी दिल्लीला गेलो नाही एवढेच सांगा, अशी मिश्किल टिपण्णी अजित पवार यांनी केली आहे.काल सर्वोच्च न्यायालयाच्या निकालापूर्वी बोलताना अजित पवार यांनी लातूरमध्ये म्हटलं होतं की जरी १६ आमदार अपात्र झाले तरी सरकारकडे बहुमत असेपर्यंत सरकारला कुठलाही धोका नाही. त्याचाच पुनरुच्चार आज पुण्यात बोलताना अजित पवार यांनी केला आहे. मी बोललो त्याचप्रमाणे सर्वोच्च न्यायालयाचा निकाल आलेला आहे. मला जे वाटले ते बोललो आणि तसा निकाल सुद्धा आलेला आहे. पण मी आणखी निकाल पत्र वाचलेले नाही. त्यामुळे मी यावर बोलणार नसल्याचं अजित पवार म्हटलं.

    Supreme Court Verdict Maharashtra Crisis: उद्धव ठाकरेंचा राजीनामा महागात पडला, शिंदे सरकार वाचलं
    सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर राज्यातील सर्वच प्रमुख नेत्यांच्या प्रतिक्रिया येत असताना आज सकाळपासूनच अजित पवार यांची मात्रकोणतीही प्रतिक्रिया समोर आली नव्हती. एका खासगी दौऱ्यावरून नाशिकहून पुण्याला आले असता त्यांनी या निर्णयावर प्रतिक्रिया दिली.
    अजित पवार यांच्या राजकीय हालचालींवरुन तसेच भाजप पाठिंब्याच्या चर्चांवरुन अजितदादा काय प्रतिक्रिया देणार? अजितदादांची भूमिका काय असणार? असा प्रश्न उभ्या महाराष्ट्राला पडला होता.

    उद्धव ठाकरेंनी राजीनामा दिला नसता तर…. सर्वोच्च न्यायालयाने निकालात काय काय म्हटलं?
    न्यायालयाने जरी निकाल दिलेला असला तरी मी अद्याप वाचला नाही. मी निकालपत्र वाचून सविस्तर भूमिका मांडेन. मला जे काही याअनुषंगाने बोलायचंय ते बोलेन. कृपा करुन फक्त मी दिल्लीला वगैरे गेलो नाही, असं लोकांना यामाध्यमातून सांगा, अशी विनंती त्यांनी प्रसारमाध्यमांना केली.

    कोर्टाने काय काय म्हटलं?

    उद्धव ठाकरे यांनी राजीनामा दिला नसता तर आम्ही पूर्वस्थिती लागू करुन सरकार पुनर्स्थापित करण्याचे निर्देश दिले असते, असं सगळ्यात मोठं निरीक्षण सर्वोच्च न्यायालयाने नोंदवलं. तसेच १६ आमदारांच्या अपात्रतेचं प्रकरण आम्ही विधानसभा अध्यक्षांकडे सोपवत आहोत, असंही सर्वोच्च न्यायालयाने म्हटलं. दुसरीकडे विधानसभा अध्यक्षांनी व्हिपची नियुत्ती बेकादेशीररित्या केली, असा शेरा मारताना शिवसेनेत दोन गट पडलेले असताना आणि याची कल्पना अध्यक्षांना असताना त्यांनी उद्धव ठाकरे यांच्या मान्यतेने कोण व्हिप आहे, हे तपासायला हवे होते, असं म्हणत अध्यक्षांच्या वर्तनावर आक्षेप नोंदवले.

    ठाकरेंचा राजीनामा, १६ आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय अन् भाजपला सणसणीत टोला, शरद पवार काय म्हणाले?
    दुसरीकडे तत्कालिन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या कार्यपद्धतीवर देखील न्यायालयाने गंभीर ताशेरे ओढताना बहुमत चाचणी बोलावणं गरजेचं नव्हतं, असं सांगताना भगतसिंह कोश्यारी यांनी या प्रकरणात आपल्या विशेषाधिकाराचा जो वापर केला तो कायद्याप्रमाणे नव्हता, असं न्यायालयाने म्हटलं.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *