शरद पवार काय म्हणाले??
आज बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार भेटले. उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव भेटले. विरोधकांची एकी राहणं गरजेचं असल्याचं आजच्या बैठकीत एकमत झालं. कर्नाटकमध्ये तेथील जनता धर्मनिरपेक्ष सरकार आणण्यासाठी आग्रही आहे, हे एक्झिट पोलमधून दिसून येतंय. नितीश कुमार-राहुल गांधी आणि विरोधी पक्षाच्या नेत्यांची बैठक नवी दिल्लीत झाली होती. त्यावेळीही विरोधी पक्षांच्या रणनितीवर आमची चर्चा झाली होती. भाजपविरोधात विरोधक पूर्ण ताकदीने काम करतील.
जर उद्धव ठाकरे यांनी राजीनामा दिला नसता तर महाराष्ट्रात राज्यात पुन्हा त्यांचं सरकार आणण्याच्या दृष्टीने प्रयत्न करता आले असते, असं निरीक्षण सर्वोच्च न्यायालयाने नोंदवलं. त्यावर शरद पवार म्हणाले, “उद्धव ठाकरे यांच्या राजीनाम्यावर बोलण्यात आता काहीच अर्थ नाही. मला जे बोलायचं होतं ते मी माझ्या पुस्तकात बोललोय. पण जे झालं ते झालं आता उद्धव ठाकरे-आम्ही आणि काँग्रेस ताकदीने काम करु”
महाराष्ट्रातलं सरकार स्थापन करतावेळी राज्यपालांची भूमिका चुकीचीच होती. राज्यकर्त्यांविरोधात न्यायालयाने तीव्र भूमिका मांडली. पण नैतिकता आणि भाजपचा काही संबंध आहे, असं वाटत नाही, असा टोला शरद पवार यांनी लगावला. तसेच १६ आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय येणं बाकी आहे, याकडेही त्यांनी लक्ष वेधलं.
पवार पंतप्रधान होतील? नितीश कुमार म्हणाले…
त्याचवेळी भाजप देशहिताच्या विरोधात काम करतंय. त्यामुळे विरोधी पक्षांनी एकत्र यावं, यासाठी माझा प्रयत्न असल्याचं सांगताना विरोधी आघाडीचा चेहरा म्हणून जर शरद पवार पुढे आले तर मला अधिक आनंद होईल, असं नितीश कुमार म्हणाले.