पाच न्यायमूर्तींचं घटनापीठ आज महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर निकाल देणार आहे. सरन्यायाधीश डी.वाय. चंद्रचूड न्यायमूर्ती एम. आर. शहा, न्यायमूर्ती कृष्ण मुरारी, न्यायमूर्ती हिमा कोहली आणि न्यायमूर्ती पी. एस. नरसिंह यांच्या घटनापीठापुढं महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाची सुनावणी पार पडली होती.
राज्यातील सत्ता संघर्षाचा निकाल आज येणार आहे. या पार्श्वभूमीवर जळगावात शिवसेना-उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे धरणगावात बजरंगबलीस साकडे घालण्यात आले. हनुमान चालीसाचे पठण करत पदाधिकार्यांनी आपल्या पक्षाच्या विजयासाठी प्रार्थना केली. महाराष्ट्रातील सत्तासंघर्षचा निकाल ठाकरे गटाच्या बाजूने लागावा म्हणून जळगावातील धरणगावात सिद्धी हनुमान मंदिरात अभिषेक व आरती करून साकडे घातले.यावेळी उपस्थित शिवसेना सह संपर्क प्रमुख गुलाबराव वाघ उपजिल्हा प्रमुख अॅड शरद माळी , शहर प्रमुख भागवत चौधरी , नगरसेवक जितेंद्र धनगर वासुदेव महाजन यांचा हस्ते आरती व भजन करण्यात पुरोहित यांच्याकडून शास्त्रपद्धतीने अभिषेक करण्यात आला.
यावेळी उपस्थित उपशहर प्रमुख रवी जाधव, छोटू चौधरी, व्यापारी सेना शहर प्रमुख दिनेश येवले , रणजित चव्हाण गोपाल चौधरी , वासू महाजन कृपाराम महाजन किरण अग्निहोत्री युवा सेना सचिव राहुल रोकडे सतोष सोनवणे , गोपाल महाजन , गणेश महाजन, प्रेमराज चौधरी रवी आहिरे,रुपेश अमृतकर भिमराव धनगर , सागर ठाकरे अरविद चौधरी राकेश चौधरी विनोद रोकडे सह शिवसेना ठाकरे गटाचे पदाधिकारी उपस्थित होते.