• Wed. Mar 11th, 2026
    मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अपात्र ठरले तर सरकार धोक्यात; संजय राऊतांचा दावा

    Maharashtra Political Crisis: सर्वोच्च न्यायालय आज महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर निकाल देणार आहे. या निकालापूर्वी संजय राऊत यांनी शिंदे गटातील अपात्रतेची टांगती तलवार असणाऱ्या १६ आमदारांना डिवचले आहे.

     

    संजय राऊत

    हायलाइट्स:

    • शिंदे-फडणवीस सरकार हे धोक्यात आहे
    • सर्वोच्च न्यायालयाने शिंदे गटाच्या १६ आमदारांना अपात्र ठरवले तर उरलेले आमदारही अपात्र ठरतील
    • मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अपात्र ठरले तर शिंदे गट संपेल
    मुंबई: ठाकरे विरुद्ध शिंदे यांच्यातील कायदेशीर लढाईमुळे सुरु झालेल्या राज्यातील सत्तासंघर्षाचा निकाल येण्यासाठी फार थोड अवधी शिल्लक राहिला आहे. काहीवेळातच सर्वोच्च न्यायालयातील घटनापीठाकडून निकालाचे वाचन केले जाईल. या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी गुरुवारी सकाळी ट्विट करुन शिंदे गट आणि भाजपला डिवचले आहे. काय झाडी ,काय डोंगर, काय हिरवळ, आज वाट पाहतोय तुमची, नरहरी झिरवळ.. जय महाराष्ट्र!, असे ट्विट राऊत यांनी केले आहे. या माध्यमातून राऊत यांनी सर्वोच्च न्यायालय शिंदे गटाच्या १६ आमदारांना अपात्र ठरवण्याचा निर्णय घेण्याचे अधिकार नरहरी झिरवळ यांच्याकडेच सोपवेल, असा विश्वास राऊत यांनी व्यक्त केला आहे.

    यानंतर संजय राऊत यांनी मुंबईत पत्रकार परिषदही घेतली. या पत्रकार परिषदेत संजय राऊत यांनी सर्वोच्च न्यायालयाचा निकाल ठाकरे गटाच्या बाजूनेच लागेल, असा विश्वास व्यक्त केला. शिंदे-फडणवीस सरकार हे धोक्यात आहे. सर्वोच्च न्यायालयाने शिंदे गटाच्या १६ आमदारांना अपात्र ठरवले तर उरलेले आमदारही अपात्र ठरतील. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अपात्र ठरले तर शिंदे गट संपेल. या निकालानंतर कोण कुठे जातंय, कोण पाताळात गाडलं जातंय, हे दिसेलच. १६ आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय झाला तेव्हा नरहरी झिरवळ विधानसभा अध्य होते. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय घेण्याचे अधिकार विधानसभा अध्यक्षांना दिले तर तो निर्णय नरहरी झिरवळ यांच्याकडेच जाईल,असा दावा संजय राऊत यांनी केला.

    जयंत पाटलांना ईडी नोटीस, राऊतांचा बोलण्यास नकार

    राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष यांनी सक्तवसुली संचलनालय अर्थात ईडीने नोटीस पाठवल्याची चर्चा आहे. त्यांना सोमवारी आयएलएफएस आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात चौकशीसाठी बोलावण्यात आल्याची माहिती आहे. यावर संजय राऊत यांना विचारले असता त्यांनी प्रतिक्रिया देणे टाळले. मध्यंतरी अजित पवार यांनी आमची बाजू मांडायला राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते समर्थ आहेत, इतरांनी आमच्या पक्षाविषयी बोलू नये, असा टोला संजय राऊत यांना लगावला होता. त्यामुळे एरवी महाविकास आघाडीच्या नेत्यांची पाठराखण करणाऱ्या संजय राऊत यांनी जयंत पाटील यांच्या ईडी नोटीसवर बोलण्यास नकार दिला. या विषयावर राष्ट्रवादी काँग्रेस बोलेल, त्यांच्याकडे वाघासारखे नेते आहेत, अशी टिप्पणी संजय राऊत यांनी केली.

    सत्तासंघर्षाचं प्रकरण ७ न्यायमूर्तींकडे जाणार? ; सुप्रीम सुनावणी उद्यावर

    जवळच्या शहरातील बातम्या

    Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.

    जलजीवन मिशन प्रादेशिक पाणी पुरवठा योजनांची कामे तातडीने पूर्णत्वास न्यावी-अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ – महासंवाद
    मिशन लक्ष्यवेध योजनेंतर्गत पुणे विभागीय निपुणता केंद्रातील प्रशिक्षणासाठी पात्र खेळाडूंना अर्ज करण्याचे आवाहन – महासंवाद
    येवला मतदारसंघातील विजेच्या पायाभूत सुविधांच्या कामांना मंजुरी मिळण्यासाठी शासनाला तातडीने प्रस्ताव पाठवावे – मंत्री छगन भुजबळ – महासंवाद

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed