• Mon. Nov 25th, 2024

    अवकाळीनं वेळ साधली, शेतकऱ्यांच्या अपेक्षांवर पाणी, कोकणातील आंबा, काजू उत्पादक संकटात

    अवकाळीनं वेळ साधली, शेतकऱ्यांच्या अपेक्षांवर पाणी, कोकणातील आंबा, काजू उत्पादक संकटात

    रत्नागिरी : कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यात आज सकाळपासून अवकाळी पावसाने धुमाकूळ घातल्यामुळे आंबा, काजू बागायतदार मोठ्या संकटात सापडला आहे. रत्नागिरी जिल्ह्यात सगळीकडेच अवकाळी पाऊस मध्यरात्रीनंतर सुरू झाला. या अवकाळी पावसामुळे अनेकांची त्रेधातिरपीट उडाली आहे. हवामान बदलाचा फटका बसल्याने आधीच अल्प प्रमाणात असलेला आंबा आता अशातच अवकाळी पावसाच्या कचाट्यात सापडला आहे. मार्च महिन्यातही असाच पाऊस झाला होता. मात्र, आंबा काजू पिकांचे नुकसान झाल्यानंतरही शासनाकडून अद्याप कोणताही सर्व्हे सुरू करण्यात आलेला नाही.

    रत्नागिरी जिल्हयात अनेक ठिकाणी पावसाने अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. अनेक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस झाला आहे. त्यामुळे अल्पप्रमाणात असलेला आंबा आता हातातून जाण्याची वेळ आंबा, काजू बागायतदारावर आली आहे. कोकणात एकदा पाऊस पडल्यानंतर आंब्याला मुंबईसारख्या मोठ्या मार्केटमध्ये दर मिळत नाही. सोमवारी सकाळपासूनच जिल्ह्यात अनेक ठिकाणी ढगाळ वातावरण होतं त्यामुळे पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात झाली होती. हवामान विभागाकडूनही मेघगर्जनेसह पावसाचा इशारा देण्यात आला होता. ७ मे ते १३ मे या दरम्यान पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

    Washim Accident: पुण्याकडे निघालेल्या ट्रॅव्हल्सला भीषण अपघात; चार जागीच ठार, १२ जण जखमी

    यावर्षी आंबा अल्प प्रमाणात म्हणजेच १५ ते २० टक्केच आहे, तसा अहवाल डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाकडून शासनाकडे देण्यात आला आहे. मात्र जे काही पीक हातात येण्याच्या मार्गावर आहे. ते मात्र या लहरी हवामानामुळे व पावसामुळे हातून जाण्याची भिती निर्माण झाला आहे. कोकणात आंबा पिकावर मोठी अर्थव्यवस्था अवलंबून असते मात्र गेले जवळपास बारा तेरा वर्षे अनेक वादळे व लहरी हवामान यामुळे कोकणी बागायतदार दरवर्षीच पुरता आर्थिक अडचणीत सापडत आहे.

    हायस्कूलमध्ये प्राध्यापक, १९९२ च्या दंगलीनंतर आयुष्य बदललं; शिक्षकी पेशातील विश्वनाथ महाडेश्वर महापौर कसे झाले?

    काही वर्षांपूर्वी आलेल्या फयान वादळाने तर आंबा,नारळ,सुपारीच्या बागाच्या बागा उध्वस्त झाल्या आहेत. त्यातच गेली काही वर्ष बदलत्या हवामानाचा फटका आंबा,काजू, फणस पिकाला बसू लागला आहे. रत्नागिरी जिल्ह्यात खेड, दापोली, वाकवली, चिपळूण, लांजा, राजापूर, देवरुख आणि गुहागरमध्ये पावसानं हजेरी लावली आहे.
    Pune News : पुण्यात मोठी घटना, विमाननगरमधील एका आयटी हबच्या चौथ्या मजल्यावर आग

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed