• Sat. Sep 21st, 2024
दुर्दैवी! सायन-पनवेल हायवेवर २०१७ मध्ये अपघातात जखमी; ६ वर्षांनंतर त्याच जागी तरुणाचा बळी

नवी मुंबई : नवी मुंबईतील कळंबोलीचा रहिवासी सौरभ सिंग याचा सहा वर्षांपूर्वी सायन-पनवेल महामार्गावर अपघात झाला होता. दुचाकी खड्ड्यात घसरल्याने तोल जाऊन तो जखमी झाला होता. दुर्दैवी योगायोग म्हणजे त्याच ठिकाणी सौरभचा पुन्हा अपघात झाला. मात्र यावेळी तो भाग्यशाली ठरला नाही. कारण या अपघातात २४ वर्षीय सौरभला प्राण गमवावे लागले.सौरभ सिंग आपल्या वडिलांसोबत लॉजिस्टिकचा व्यवसाय करत होता. २०१७ मध्ये बाईकने प्रवास करताना खड्ड्यात आदळून तो गंभीर जखमी झाला होता. त्यानंतर सौरभचे काका दीपक सिंग यांनी सायन पनवेल महामार्गाची दुरवस्था आणि त्यामुळे वाहन चालकांना असलेल्या धोक्याबद्दल मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली.

हे प्रकरण अद्याप न्यायालयात प्रलंबित असताना सौरभचा त्याच महामार्गावर एक मे रोजी अपघाती मृत्यू झाला. ट्रिपल सीट जाणाऱ्या दुचाकीस्वाराला बाईक धडकून सौरभचा मृत्यू झाला. सौरभ मध्यरात्रीच्या सुमारास घराकडे निघाला होता. यावेळी या महामार्गावर नेरूळ येथे हा अपघात झाला. पोलिसांनी सौरभला एनएमएमसी हॉस्पिटलमध्ये नेले, तिथे दाखल केल्यावर त्याला मृत घोषित करण्यात आले

नेरुळ पोलीस या प्रकरणाचा तपास करत असून त्यांनी बाईकचालक मोहसीन खान याच्याविरुद्ध आयपीसी आणि मोटर वेहिकल अॅक्टच्या विविध कलमांखाली रॅश ड्रायव्हिंग आणि वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी एफआयआर दाखल केला आहे.

२६ वर्षीय मैत्रिणीची हत्या, कल्पनेपलिकडच्या ठिकाणी पुरले बॉडीचे तुकडे, कारण ठरलं फक्त…
सार्वजनिक कल्याण विभाग (PWD) आणि रस्त्याच्या काँक्रिटीकरणाच्या कामासाठी नेमलेले कंत्राटदार यांना दीपक सिंग यांनी आपल्या पुतण्याच्या मृत्यूला तितकेच जबाबदार ठरवले आहे.

१५ वर्षानंतर शिक्षकाला पहिला पगार मिळाला, घरी पोहोचतानाच काळाने गाठलं, मुलासह प्रवास थांबला

२०१७ मधील घटनेनंतर, दीपक सिंह यांनी रस्त्याच्या दुरवस्थेमुळे कुटुंबाला झालेला त्रास पाहून नवी मुंबई पोलीस विभागाकडून जानेवारी २०१६-१७ दरम्यान महामार्गावर झालेल्या अपघातांच्या संख्येचा तपशील माहितीच्या अधिकाराद्वारे मागवला. रस्त्याच्या निकृष्ट अवस्थेमुळे २४२ अपघातात ९३ मृत्यू झाल्याचे समोर आले. माझ्या याचिकेमध्ये माझ्या पुतण्याला झालेल्या जीवघेण्या अपघाताचा संदर्भही दिला होता. यामुळे हायकोर्टाने पीडब्ल्यूडी आणि राज्य सरकार या दोघांनाही उत्तर दाखल करण्याचे निर्देश दिले होते, असे दीपक सिंग म्हणाले.

आई आम्ही येतो गं! माऊलीचा आशीर्वाद घेऊन कुटुंब निघाले, पण कोणीच परतलं नाही; ११ जणांचा अंत

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed