• Mon. Nov 25th, 2024

    दीलजीत दोसांज लाइव्ह कॉन्सर्टवरुन कोथरुडमध्ये राडा, राजकीय पक्ष रस्त्यावर उतरले, काय कारण?

    दीलजीत दोसांज लाइव्ह कॉन्सर्टवरुन कोथरुडमध्ये राडा, राजकीय पक्ष रस्त्यावर उतरले, काय कारण?

    Diljit Dosanjh Concert Pune: शहराची संस्कृती बिघडवणाऱ्या कार्यक्रमांना परवानगी नको, कार्यक्रम रद्द करा, अशा स्पष्ट सूचना उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील आणि केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी दिल्यानंतर या कार्यक्रमातील संभाव्य मद्यविक्री थांबविण्यात आली.

    महाराष्ट्र टाइम्स
    kothrud concert

    म. टा. प्रतिनिधी, पुणे : कोथरूड परिसरात रविवारी सायंकाळी आयोजिण्यात आलेल्या प्रसिद्ध पंजाबी गायक दिलजित दोसांजच्या ‘लाइव्ह कॉन्सर्ट’ला विविध राजकीय पक्षांसह संस्था, संघटनांनी तीव्र विरोध केला. ‘शहराची संस्कृती बिघडवणाऱ्या कार्यक्रमांना परवानगी नको, कार्यक्रम रद्द करा,’ अशा स्पष्ट सूचना उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील आणि केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी दिल्यानंतर या कार्यक्रमातील संभाव्य मद्यविक्री थांबविण्यात आली.

    भारतीय जनता पक्ष व त्यांच्याशी संबंधित संघटना, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, युवा वाद्य पथकाने तीव्र विरोध केला. पोलिसांना निवेदन देण्यात आले, कर्वे रस्त्यावर घोषणाबाजीही झाली. दरम्यान, कार्यक्रमाच्या काही वेळ आधी त्या ठिकाणी वाहनांमध्ये बसून आणि रस्त्यावर तरुण-तरुणी मद्यपान करताना आढळले. त्यांना कार्यकर्त्यांच्या रोषाच्या सामना करावा लागला.
    अपेक्षित निकालांसाठी दबाव, माजी सरन्यायाधीश चंद्रचूड यांची कबुली, राजकारणावरही भाष्य
    ‘दादां’च्या संतापानंतर बदल

    कोथरूडमध्ये होणाऱ्या कार्यक्रमाला पोलिसांनी परवानगी कशी दिली, ती परवानगी रद्द करावी, अशी मागणी थेट राज्याचे मंत्री चंद्रकांत पाटील यांनी पोलिस आयुक्त अमितेशकुमार यांच्याकडे केली. पाटील यांनी तीव्र भावना व्यक्त केल्यानंतर त्या कार्यक्रमाच्या ठिकाणी मद्यविक्री व सेवनाला परवानगी नाकारण्याचा निर्णय घेण्यात आला. पोलिस आयुक्तांना तंबी मिळाल्यानंतर त्यांनी तातडीने राज्य उत्पादन शुल्क विभागाला पत्र पाठवून मद्यविक्रीस परवानगी न देण्याच्या सूचना केल्या.
    कोण होणार महाराष्ट्राचे मुख्यमंत्री? निवडणुकीतील विजयानंतर महायुतीत खल; शीर्षस्थ नेते घेणार निर्णय
    ‘व्हीआयपी ट्रीटमेंट’ का ?
    शहरात यापूर्वी अनेक ‘लाइव्ह कॉन्सर्ट’ झाले आहेत. या सर्व ठिकाणी पोलिसांनी साधारण बंदोबस्त नेमल्याचे दिसून आले होते. या बंदोबस्तासाठी पोलिसांनी आयोजकांकडून शुल्क आकारणी केली. मात्र, पुणे पोलिसांनी रविवारी कोथरूडच्या कार्यक्रमासाठी विशेष बंदोबस्त नेमला होता. त्यासाठी बंदोबस्ताचे स्वतंत्र नियोजनही केले होते. एक उपायुक्त, एक सहायक आयुक्त, १५ निरीक्षक, सुमारे १७५ कर्मचारी या बंदोबस्तासाठी नेमण्यात आले होते.

    किशोरी तेलकर

    लेखकाबद्दलकिशोरी तेलकर किशोरी तेलकर, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये कन्सल्टंट म्हणून कार्यरत असून पत्रकारितेमध्ये पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले आहे. ऑनलाइन माध्यमांमध्ये फ्रीलान्सिंगचा २ वर्षांचा अनुभव आहे आणि आता मटा ऑनलाइनमध्ये आहे. जनरल बातम्यासोबतच गुन्हेगारीविषयक बातम्यांमध्ये रस…. आणखी वाचा

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed