• Mon. Nov 25th, 2024
    वागबीळ घाटात मोठी दुर्घटना, भरधाव कार २०० फूट दरीत कोसळली, केवळ दैव बलवत्तर म्हणून…

    कोल्हापूरः रत्नागिरी महामार्गावरील वाघबीळ घाटात नागमोडी वळणावर विशाळगडहून हुबळी धारवाडकडे निघालेली भरधाव कार काल २०० फूट दरीत कोसळली असून या अपघातात ४ जण गंभीररीत्या जखमी झाले. या घटनेची लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी (दि.६) रोजी रात्री गाडी क्रमांक KA63 M 9568 या कारमधून विशाळगडाहून हुबळी धारवाडकडे निघालेले इम्रान मुस्तफा मुंडके (वय ३९) महंमदअली नूरमहंमद बिजापूर (वय २२) इम्रान शरीफ बागवान (वय२४) शाकिर मुन्ना कितुर (वय २०) सर्वजण राहणार हुबळी (ता. धारवाड) हे पहाटेच्या दरम्यान, वाघबीळ घाटातील एका नागमोडी वळणावरील संरक्षक कठड्याजवळ आले. यावेळी अचानक कार दरीत कोसळली. यामध्ये कारमधील सर्वजण जखमी झाले. याच अवस्थेत झाडा-झुडपांचा आधार घेऊन सर्वजण रस्त्यावर आले आणि एका खासगी रुग्णवाहिकेतून ते खासगी रुग्णालयात दाखल झाले.

    छत्रपती शिवरायांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य, १७ वर्षीय तरुणाला अटक, भिवंडीतील प्रकार
    दरम्यान, पहाटेच्यावेळी घडलेल्या या अपघाताची माहिती येथील सामाजिक कार्यकर्ते पंडित नलवडे यांना मिळाली आणि त्यांनी तात्काळ घटनास्थळी जाऊन पाहणी केली असता त्या ठिकाणी कुणी नसल्याचे निदर्शनास आले. त्यांनी या घटनेची माहिती कोडोली व महामार्ग पोलिसांना दिली यानंतर महामार्ग पोलिसांनी घटनास्थळी येऊन पाहणी केली असता दरीत कोसळलेल्या कारचा टायर फुटला होता. टायर फुटून हा अपघात झाला असावा, अशी शक्यता पोलिसांनी वर्तवली. घटनास्थळी दिवसभर नागरिकांनी गर्दी केली होती. दरम्यान चारही जणांवर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

    पावसाळा सुरू होण्यास अवघे २५ दिवस, पिंपरी-चिंचवड पुराच्या उंबरठ्यावर, कारण काय?

    ढोल ताशाच्या गजरात चैत्र यात्रेला सुरूवात; लाखो भाविकांनी जोतिबाच्या डोंगर फुलला

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed