• Mon. Nov 25th, 2024

    भाजपच्या गणेश नाईकांविरोधातील बलात्काराची तक्रार मागे, महिलेचा शिवसेनेवर धक्कादायक आरोप

    भाजपच्या गणेश नाईकांविरोधातील बलात्काराची तक्रार मागे, महिलेचा शिवसेनेवर धक्कादायक आरोप

    नवी मुंबई: ऐरोली मतदार संघाचे आमदार गणेश नाईक यांच्यावर दीपा चौहान यांनी बलात्काराचा आरोप केला होता. त्याबाबत आमदार गणेश नाईकांवर बलात्काराचा गुन्हा देखील झाला होता. नाईक यांनी उच्च न्यायालयातून अटकपूर्व जामीन देखील मिळवला होता. मात्र या प्रकरणाला पुन्हा वेगळं वळण आले असून, दीपा चौहान या महिलेने गणेश नाईक यांच्यावरील आरोप मागे घेतला आहे. दीपा चौहान यांनी पोलिसांना लिहिलेल्या अर्जात लिहिले आहे की, आमदार गणेश नाईक यांच्याशी माझ्या वडिलांचे व भावाचे मित्रत्वाचे संबंध आहेत. मला समाजसेवेची आवड असून त्यानिमित्ताने माझी मंदा म्हात्रे यांच्याशी माझा परिचय झाला. मंदा म्हात्रे यांनी त्यांचे राजकीय विरोधक गणेश नाईक यांच्याविरोधात खोटे बलात्काराचे तसेच मुलाला बंदूक दाखवून जिवे मारण्याची धमकी दिली, असे खोटे आरोप करण्यास सांगत गुन्हा दाखल करण्यास सांगितले. विजय चौगुले यांच्याशी माझी ओळख करून दिली. चौगुले यांनी एका वकिलाला बोलावले त्यांचे नाव मला आठवत नाही गणेश नाईक यांच्यावर अजामीनपात्र गुन्ह दाखल करून त्यांची राजकीय कारकीर्द उद्धवस्त करायचे अशा प्रकारची चर्चा त्या वकिलासमवेत चौगुले यांनी केल्याचा आरोप दीपा चौहान यांनी पत्रात केला आहे.

    Ganesh Naik: अज्ञातवासातून बाहेर पडताच गणेश नाईकांचा विरोधकांना इशारा, म्हणाले…

    गणेश नाईक यांच्या विरोधात लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या एका महिलेनं बलात्काराचे आरोप मागे घेतले आहेत. त्यामुळे भाजपा नेते गणेश नाईक यांना मोठा दिलासा मिळाला आहे. दीपा चव्हाण यांनी आमदार गणेश नाईक यांच्याबाबत बलात्काराची केलेली तक्रार मागे घेणारे पत्र नेरूळ पोलीस ठाण्यात दिले आहे. एप्रिल २०२२ ला दीपा चव्हाण यांनी गणेश नाईक यांच्या विरोधात बलात्काराची तक्रार केली होती. यासाठी शिवसेनेकडून ऑफर देण्यात आल्याचा दावा देखील दीपा चव्हाण यांनी पत्रात केला आहे.

    गणेश नाईक यांना कोणत्याही क्षणी अटक; शोध घेण्यासाठी पोलिसांचे पथक रवाना!

    १५ एप्रिल २०२३ रोजी आपल्या सी.बी.डी. बेलापूर पोलीस स्टेशनला भारतीय दंड संहिता १८६० कलम ५०६ (२), कलम ४१७ व शस्त्र अधिनियम १९५९ कलम ३० अन्वये गुन्हा दाखल करून घेतला. कालांतराने त्यांचे उद्दिष्ट पूर्ण झाल्यानंतर विजय चौगुले व मंदा म्हात्रे यांनी यांनी मला दिलेला पाठिंबा काढून घेतला व माझा त्यांच्या राजकारणासाठी वापर करून घेतला. गणेश नाईक यांच्याबद्दल माझी कोणतीही तक्रार नसून मी माझी तक्रार मागे घेते. असे दीपा चौहान यांनी पत्रात म्हटले आहे.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed