पियुष विजय जीवडे (वय८ राहणार नाशिक),कपिल किरण त्रिभुवन (वय २३ राहणार बेलगाव तालुका वैजापूर) असे मृत्यू झालेल्या तरुणांचे नाव आहे. कपिल हा आई-वडिलांना एकुलता एक होता तो अभ्यासात हुशार होता. सध्या तो अभियांत्रिकेच्या तिसऱ्या वर्षाचं शिक्षण घेत होता.या प्रकरणी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जागरण गोंधळाच्या कार्यक्रमानिमित्त वाघे हे कार्यक्रमासाठी कासली या गावाकडे निघाले होते. दरम्यान रस्त्यामध्येच त्यांनी बेलगाव या ठिकाणी आराम करण्यासाठी बिऱ्हाड थांबवलं सर्वजण आराम करत असताना कलाकारांच्या सोबत असलेला पियुष हा बाजूला खेळत होता. मात्र पियुष हा खेळत शेततळ्याजवळ गेला शेततळ्यात पाण्याचा अंदाज बुडाला. दरम्यान ही बाब लक्षात येतच नागरिकांनी त्या ठिकाणी धाव घेतली चिमुकल्याचा जीव वाचवण्यासाठी कपिल याने क्षणाचाही विचार न करता पाण्यात उडी घेतली. मात्र, पाण्याचा अंदाज न आल्यामुळे दोघेही पाण्यात बुडाले दरम्यान घटनेची माहिती पोलिसांना दिली असता घटनास्थळी पोलीस दाखल झाले दोघांनाही बाहेर काढून ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले याप्रकरणी वैजापूर पोलीस ठाण्यामध्ये आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोलीस करीत आहे.
दरम्यान सहकारी कलाकारातील दोन जणांचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्यामुळे कलाकारांमध्ये दुःखाचा डोंगर कोसळला दोन्ही कुटुंबांनी घटनेची माहिती मिळताच टाहो फोडला. जिवडे कुटुंबातील चिमुकला आणि त्रिभुवन कुटुंबातील एकुलता एक उच्चशिक्षित मुलांचा मृत्यू झाल्यामुळे त्यांच्या घरावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.