• Sat. Sep 21st, 2024

छत्रपती संभाजीनगरमध्ये अरिजीत सिंगच्या कार्यक्रमासाठी पोलिसांचा महत्त्वाचा निर्णय

छत्रपती संभाजीनगरमध्ये अरिजीत सिंगच्या कार्यक्रमासाठी पोलिसांचा महत्त्वाचा निर्णय

छत्रपती संभाजीनगर: शहरामध्ये प्रसिद्ध गायक अरिजीत सिंग याचा ‘संगीत रजनी’ हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे ७ मे रोजी सायंकाळी पाच ते दहा वाजेपर्यंत हा कार्यक्रम सुरू असणार असल्यामुळे या कार्यक्रमासाठी दहा हजार लोक उपस्थित राहणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली यामुळे नागरिकांची गैरसोय होऊ नये यासाठी वाहतूक व्यवस्थेत बदल करण्यात आला आहे.

छत्रपती संभाजी नगर शहरांमध्ये प्रसिद्ध गायक अरिजीत सिंग यांचा संगीत रजनी हा कार्यक्रम यश ग्लोबल नारेगाव रोड गरवारे स्टेडियम जवळ आयोजित करण्यात आला आहे गेल्या काही दिवसांपासून या संगीत रजनी कार्यक्रमाची जोरदार जाहिरातबाजी केली जाते. यामुळे प्रसिद्ध गायकाला बघण्यासाठी प्रचंड गर्दी होईल ही बाब पोलिसांच्या लक्षात आली. कार्यक्रमासाठी तब्बल दहा हजार प्रेक्षक येणार असल्याची माहिती आहे. यामुळे कार्यक्रमाच्या दिवशी शहरवासीयांची गैरसोय होऊ नये यासाठी पोलिसांनी खबरदारी बाळगले आहे. दरम्यान कार्यक्रमाच्या दिवशी सात मे रोजी दुपारी दोन पासून रात्री दहा पर्यंत गरिबारी स्टेडियम कॉर्नर क्रांती गुरु लहुजी साळवे चौक ते कलाग्राम पूजन मॉल कडे जाणारा रस्ता व या रस्त्यावर दोन्ही बाजूस येणारे वाहनांना प्रवेश बंदी करण्यात आली असल्याची माहिती प्रभारी सहाय्यक पोलीस आयुक्त (वाहतूक शाखा) दिलीप गांगुर्डे यांनी दिली.

हॉस्पिटलचं बिल १२ लाखांपलीकडे…जीवन मृत्यूशी लढणाऱ्या अभिनेत्रीच्या मदतीला धावून आला अरिजीत सिंग

हे आहेत पर्यायी मार्ग

१) प्रोझोन मॉलकडून कलाग्राम- गरवारेकडे येणारी वाहतूक हॉटेल द पलमस मार्गे नारेगाव रोड मार्गे पुढे जातील.

२) चिकलठाणा एम.आय.डी.सी.कडुन कलाग्राममार्गे येणारी वाहतूक ही प्रोझोन मॉल मार्गे येतील व जातील. बंदोबस्त प्रभारी अधिकारी हे आवश्यकतेनुसार वाहतूक वळवतील किंवा मार्गात बदल करतील. अधिसुचना ही पोलीस, रुग्णवाहिका, अग्निशमन दल व अत्यावश्यक सेवेच्या वाहनांना लागु राहणार नाही.

चेन्नईच्या थालाची सगळीकडे क्रेझ! भारताचा सुपरस्टार गायक अरिजीत सिंहने थेट धरले धोनीचे पाय

शहरामध्ये प्रसिद्ध गायक अरिजीत सिंग यांचा कार्यक्रम असल्यामुळे वाहतुकीत बदल करण्यात आला आहे नागरिकांनी याची नोंद घ्यावी तसेच वाहतुकीसाठी बंद करण्यात आलेल्या रस्त्याने वाहने घेऊन जाऊ नये पर्यायी रस्त्याचा वापर करावा असे आव्हान पोलिसांच्या वतीने करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed