• Sat. Sep 21st, 2024

मैत्रिणीचा वाढदिवस साजरा करायला नेले, मात्र तिथे घडले भलतेच, मित्रानेच रचला होता भयंकर कट

मैत्रिणीचा वाढदिवस साजरा करायला नेले, मात्र तिथे घडले भलतेच, मित्रानेच रचला होता भयंकर कट

साताराः वाढदिवसाचा केक कापण्यासाठी निर्जनस्थळी गेलेल्या दोन मैत्रिणी व त्यांच्या एका मित्राला तिघांनी कोयत्याचा धाक दाखवून लुटले. ही घटना बुधवारी टेंभू (ता. कराड) येथे घडली होती. यात मित्रच मुख्य सूत्रधार असल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे. पोलिसांनी बनाव करणाऱ्या मित्रास २४ तासात अटक केली आहे. तर त्याच्या तीन साथीदारांचा पोलिसांकडून शोध सुरू आहे. अटक केलेल्या मित्रास आज न्यायालयात हजर केले असता पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. सचिन कोळी असे मित्राचे नाव आहे.याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, सचिन कोळी हा त्याच्या मैत्रिणीचा वाढदिवस साजरा करण्यासाठी जाणार होता. मात्र, ज्या मैत्रिणीचा वाढदिवस होता तिच्या मैत्रिणीस घेऊन ये असा अट्टहास सचिन याने धरला. ती वाढदिवसाचा केक कापण्यासाठी तयार झाली. सचिन त्या दोन मैत्रिणींना घेऊन गेला. त्याठिकाणी गेल्यानंतर संबंधित दोन्ही युवती आणि सचिन कोळी हा कारमधून उतरून बोलत थांबले होते. त्यावेळी तिथे आलेल्या तिघांनी कोयत्याचा धाक दाखवत सोने आणि मोबाईल काढून घेतले.
कर्नाटक विधानसभा निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यात; राज्यातील नेते कर्नाटकच्या मोहिमेवर
दरम्यान, वाढदिवस साजरा करण्यासाठी आलेल्या मैत्रिणीकडे त्या संशयितांनी गळ्यातील चेन काढून दे अशी मागणी केली. मात्र संबंधित युवतीकडे चेन नसल्याने संशयितांनी त्या युवतीस मारहाण केली. दरम्यान, त्याच वेळी युवतीस तिच्या आईचा फोन आला. त्यावेळी त्या युवतीने घाबरत “आम्हाला अज्ञातांनी कोयत्याचा धाक दाखवून सोने काढून घेतले आहे. तुम्ही लवकर टेंभू येथील डोंगरात,” या असे सांगितले. त्यानंतर संशयितांनी तेथून पळ काढला.

यंदाचा मे महिना मुंबईकरांसाठी कमी तापदायक ठरणार; हवमान विभागाचा अंदाज एकदा वाचाच
त्यानंतर युवतीच्या नातेवाईकांनी पोलिसात तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलिसांनी सचिन कोळी व त्याच्या दोन मैत्रिणींना चौकशीसाठी बोलविले. चौकशीत सचिन कोळी हाच मुख्य संशयित असल्याचे समोर आले आहे. त्याला न्यायालयात हजर केले असता ५ दिवसाची पोलीस कोठडी देण्यात आली आहे. दरम्यान, सचिनच्या मित्रांचा शोध सुरू असून अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक भैरव कांबळे करीत आहेत.

मुंबईकरांना दुर्लक्ष भोवले! २८४० जणांना नोटिसा, तर ६७ जणांवर खटले; तुम्हीही अशीच चूक करताय का?

आम्ही मेल्यावर सरकार जमिन देणार का? भाकरी-तुकडा घेऊन आजी आंदोलनात, धरणग्रस्तांचे मनोबल वाढवतेय ७५ वर्षीय वाघीण

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed