छत्रपती संभाजीनगर: उन्हाळा सुरू असल्याने रात्री हवेशीर घराच्या छतावर झोपण्यासाठी गेलेल्या ४० वर्षीय व्यक्ती झोपेत छतावरून तोल जाऊन पडून मृत्यू झाला. ही घटना २४ एप्रिल रोजी रात्री बारा वाजण्याच्या सुमारास घडली. ही व्यक्ती छतावरून कोसळून जखमी झाल्यानंतर तिला तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचार सुरू असताना २९ रोजी या व्यक्तीचा मृत्यू झाला. याप्रकरणी खुलताबाद पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.याप्रकरणी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,सारंगधर सांडू ठेंगडे (वय ४० वर्षे, राहणार- पळसवाडी, तालुका- खुलताबाद, जिल्हा छत्रपती संभाजीनगर) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. सारंगधर हे शेती व्यवसाय करतात. या शेती व्यवसायावर त्यांचा उदरनिर्वाह चालतो. त्यांना तीन मुली आहेत. तर त्यांची पत्नी भोळसर आहे. सारंगधर यांना देखील एका डोळ्याने कमी दिसत होते.
पिंपरीत कोयता गँगचा धुडगूस! मेडिकल दुकानात पाण्याचे पैसै मागितले, केले धक्कादायक कृत्य
वातावरणात बदल होत असल्याने उष्णतेचे प्रमाण वाढत चालले आहे. उकडत असल्याने सारंगधर घराच्या छतावर झोपण्यासाठी गेले. त्यानंतर पाणी पिण्यासाठी ते पुन्हा खाली आले. पाणी पिऊन झाल्यानंतर ते पुन्हा छतावर झोपण्यासाठी गेले. मात्र छताला कठडे नसल्याने त्यांचा तोल गेला आणि ते छतावरून खाली कोसळले. यामध्ये ते गंभीर जखमी झाले. त्यांना उपचारासाठी घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचार सुरू असताना शनिवार दिनांक २९ एप्रिल रोजी त्यांची प्राणज्योत मालवली.जेवण झाल्यावर महिला घरासमोर शतपावली करत होती, काही कळण्याच्या आत दुचाकीस्वारांनी साधवा डाव
कुटुंबातील कर्ता व्यक्ती गेल्याने ठेंगडे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला. याप्रकरणी खुलताबाद पोलीस ठाण्यामध्ये आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल राकेश आव्हाड करीत आहे. उन्हाळा सुरू असल्यामुळे रात्री घराच्या छतावर झोपण्यासाठी जाणाऱ्या नागरिकांनी असा अनुचित प्रकार घडू नये याची काळजी घ्यावी, असे आव्हान देखील पोलिसांच्या वतीने करण्यात आले आहे.
नवी मुंबईच्या ऋषिकेश मानेची उत्तुंग भरारी, IFT दक्षिण आशियाई-१२ मध्ये करणार देशाचे नेतृत्व