पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहरात कोयता गँगने पुन्हा एकदा डोके वर काढल्याचे पहायला मिळत आहे. पिंपरी परिसरात चोवीस तास सुरू असणाऱ्या एका मेडिकल शॉपमध्ये शिरून सहा जणांच्या टोळक्याने एकावर कोयत्याने वार केल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी पिंपरी पोलिसांकडून सात ते आठजणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या घटनेबाबत अधिक माहिती अशी की, पिंपरी परिसरात असलेल्या मेडिकल दुकानामध्ये काही तरुण आले होते. त्यांनी मेडिकल दुकानातून पाण्याची बाटली घेतली. त्यानंतर दुकानात काम करणाऱ्या मुलाने त्यांच्याकडे पैसे मागितले. मात्र त्या तरुणांनी, तुला पैसे पाहिजेत का, थांब तुला खल्लासच करतो, असे म्हणत त्याच्यावर कोयत्याने वार केले. पाण्याच्या बाटलीचे पैसे मागितल्यावरून ही तोडफोड केल्याची माहिती समोर आली आहे.
संबधित तरुण गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर वायसीएम रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तसेच त्या टोळक्याने मेडिकल दुकानाची मोठ्या प्रमाणावर तोडफोड देखील केली आहे. तसेच हातात कोयते घेऊन या तरुणांनी दहशत परावण्याचे काम केले.
संबधित तरुण गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर वायसीएम रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तसेच त्या टोळक्याने मेडिकल दुकानाची मोठ्या प्रमाणावर तोडफोड देखील केली आहे. तसेच हातात कोयते घेऊन या तरुणांनी दहशत परावण्याचे काम केले.
पिंपरी परिसरात पुन्हा कोयता गँगची दहशत
या घटनेने पिंपरी परिसरातील व्यवसायिक मोठ्या दहशतीखाली आले आहेत. या घटनेने पिंपरी परिसरात पुन्हा एकदा कोयता गॅंगची चर्चा सुरू झाली आहे. तसेच याच गॅंगने मध्यरात्री सात ते आठ वाहनांची तोडफोड केली आहे. पोलिसांकडून या प्रकरणी नऊ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कोयता गॅंगमुळे व्यापाऱ्यांबरोबरच सर्वसामान्य नागरिकांना देखील याचा त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे पोलिसांनी या दहशत पसरवणाऱ्या व्यक्तींच्या मुसक्या आवळून त्यांना शिक्षा करावी अशी मागणी करण्यात येत आहे.
पिंपरी चिंचवड शहरात गुन्हेगारी वाढत असून त्यावर आळा बसने तेवढेच गरजेचे आहे. या घटनेने कायद्याचा धाक राहिला की नाही अशी चर्चा आता सुरू झाली आहे.