• Mon. Nov 25th, 2024
    पानपट्टीवरची २०० रुपयांची उधारी जीवावर बेतली, डोक्यात सिमेंटचा पाईप घालून तरुणाची हत्या

    कोल्हापूर:डॉक्टरांकडे जाऊन येतो असे सांगून बाहेर पडलेल्या तरुणाचा सिमेंट पाईप डोक्यात घालून आणि शरीरावर धारदार शस्त्राने वार करून निर्घृण खून केल्याची घटना काल गुरुवारी समोर आली होती. गणेश नामदेव संकपाळ (वय ४०) राहणार गणेश कॉलनी उचगाव असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. दरम्यान हा खून केवळ २०० रुपयांच्या उधारीवरून खून करण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

    एकीकडे चप्पल, दुसरीकडे रुमाल, डॉक्टरकडे जाण्यासाठी निघालेला तरुण सकाळी रस्त्यात मृतावस्थेत

    गणेश हा येथील एका फर्निचरच्या दुकानात काम करत होता. बुधवारी रात्री साडेसातच्या सुमारास गणेश संकपाळ हा डॉक्टरांकडे जाऊन येतो म्हणून घराबाहेर पडला मात्र तो घरी परतलाच नाही. गणेशला दारू पिण्याचे व्यसन होते. तर येथेच परिसरात संशयित आरोपी विकी जगदाळे याची पानपट्टी आहे. गणेश या पानपट्टीत जाऊन उधारीवर सिगरेटचे पाकीट घेतले होते. दरम्यान उधारी देण्यासाठी तो आला नाही म्हणून वसुलीसाठी विकी त्याच्या अन्य साथीदारांसोबत उधारी वसूल करण्यासाठी त्याच्याकडे गेला यावेळी पैशांवरुन दोघांमध्ये वादावादी झाली आणि याचे रूपांतर हाणामारीत झाले. त्यानंतर गणेश संकपाळ यांच्या पाठीवर आणि पोटावर धारदार शस्त्राने वार करून डोक्यात सिमेंटचा पाईप घालत निर्घृण खून करण्यात आला असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.

    मृत अर्भकाचे कुत्र्यांनी तोडले लचके; कोल्हापूरातील सीपीआर रुग्णालयातील धक्कादायक प्रकार

    पुणे-बंगळुरु राष्ट्रीय महामार्गात लगत असलेल्या कृषी महाविद्यालयाच्या आवारात गणेशाचा रक्ताने माखलेला मृतदेह फिरायला जाणाऱ्या व्यक्तींच्या नजरेस पडला होता. याची माहिती गांधीनगर पोलिसांना समजतात गांधीनगर पोलीस घटनास्थळी धाव घेतली. दरम्यान गणेश संकपाळ यांच्या पाठीवर आणि पोटावर धारदार शस्त्राने वार करून डोक्यात सिमेंटचा पाईप घालत खून केल्याचे निष्पन्न झाले आणि पोलिसांनी वेगाने तपासाची चक्रे फिरविली आणि अवघ्या तीन तासाच्या आत संशयितांना ताब्यात घेतले आहे. यामध्ये संशयित आरोपी पानपट्टी चालक विकी जगदाळे (वय वर्ष २०, रा. चपाले गल्ली), रतनकुमार रमेश राठोड (वय वर्ष २०), ओम गणेश माने (वय वर्ष 21 तिघेही रा. उचगाव), रोहन गब्बर कांबळे (वय वर्ष २०, रा. टेंबलाई नाका रेल्वे फाटक), करण राजेंद्र पुरी (वय वर्ष 23, रा. रेसकोर्स नाका संभाजीनगर) अश्या पाच संशयिताना पोलिसांनी ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरू आहे.

    विम्याचे एक कोटी मिळविण्यासाठी चक्क पत्नीनेच करवून घेतला पतीचा खून

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed