• Mon. Mar 16th, 2026

    पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी: ईदनिमित्त शहरातील वाहतुकीत मोठे बदल, कोणते रस्ते बंद? जाणून घ्या

    पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी: ईदनिमित्त शहरातील वाहतुकीत मोठे बदल, कोणते रस्ते बंद? जाणून घ्या

    म. टा. प्रतिनिधी, पुणे :गोळीबार मैदान चौक येथे ईदच्या निमित्ताने नमाज पठणाचा(२२ किंवा २३ एप्रिल रोजी) कार्यक्रम कार्यक्रम होणार आहे. त्यामुळे त्या ठिकाणी नमाज पठण पूर्ण होईपर्यंत परिसरातील वाहतूक वळविण्यात येणार आहे. याबरोबरच शहरातील अन्य भागांतील ईदगाह मैदानांवर नमाज पठण होणार आहे. तेथील परिस्थितीनुसार वाहतूक बंद अथवा अन्य मार्गाने वळविण्यात येईल, असे वाहतूक पोलिसांनी सांगितले आहे.असा असेल वाहतूक बदल

    – सोलापूर रस्त्याने मम्मादेवी चौक येथून गोळीबार चौकाकडे जाणारी वाहतूक वळविण्यात येणार आहे.

    (पर्यायी मार्ग : मम्मादेवी चौक, बिशप स्कूलमार्गे किंवा कमांड हॉस्पीटलमार्गे वाहनचालकांनी जावे.)

    – गोळीबार मैदान चौकातून स्वारगेटकडे जाणारा मार्ग हा नमाज पठणाच्या वेळी वाहतुकीसाठी बंद राहील.

    (पर्यायी मार्ग : गोळीबार चौकातून डाव्याबाजूस वळून ‘सीडीओ’ चौकातून पुढे उजवीकडे वळून गिरीधर भवन चौक, सेव्हन लव्हज चौकातून इच्छितस्थळी जावे.)

    – सेव्हन लव्हज चौकाकडून गोळीबार मैदानकडे येणारी वाहतूक बंद.

    (पर्यायी मार्ग : सॅलिसबरी पार्क, सीडीओ चौक, भैरोबा नाला येथून वाहने इच्छितस्थळी जातील.)

    – भैरोबानालाकडून गोळीबार मैदानाकडे जाणारी वाहतूक भैरोबानाला येथून वळविण्यात येणार आहे.

    (पर्यायी मार्ग : प्रिन्स ऑफ वेल्स रस्त्याने किंवा भैरोबानाला, वानवडी बाजार चौक येथून वाहने इच्छितस्थळी जातील.)

    – कोंढवा परिसरातून गोळीबार मैदानाकडे येणारी सर्व जड वाहने, प्रवासी बस, पीएमपी बस यांना प्रवेश बंद करण्यात येईल.

    (पर्यायी मार्ग : लुल्लानगर चौकातून भैरोबानाला चौक किंवा गंगाधाम चौकातून वाहने इच्छितस्थळी वाहने जातील.)

    निवृत्त कर्नलने भंगार बसपासून बनवलं स्वप्नातलं घरं; टीव्ही पासून बाथरूम पर्यंत सगळ्या सोयी

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed