• Sat. Sep 21st, 2024

महाराष्ट्रात भाजपला सत्तेची सूत्रं एकहाती मिळतील का? कीर्तिकर इतिहास काढत म्हणाले शक्य…

महाराष्ट्रात भाजपला सत्तेची सूत्रं एकहाती मिळतील का? कीर्तिकर इतिहास काढत म्हणाले शक्य…

जालना :महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींना गेल्या काही दिवसांपासून वेग आला आहे. आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून मोर्चेबांधणी केली जात आहे. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्त्वातील शिवसेनेचे नेते देखील राज्यभरात दौरे करत आहेत. खासदार गजानन कीर्तिकर यांनी जालना दौऱ्यावर असताना भाजप आणि सेनेच्या युतीसंदर्भात मोठं वक्तव्य केलं आहे. भाजपची देश पातळीवरील वाटचाल आणि महाराष्ट्रातील वाटचाल यावर कीर्तिकर यांनी भाष्य केलं आहे.

राष्ट्रीय स्तरावरील सत्तेची सर्व सूत्रे भाजपा कडे आहेत,पण महाराष्ट्रात विचार केला तर सत्तेची सूत्र एकहाती भाजपच्या हातात कधीच मिळालेली नाहीत आणि मिळण्याची शक्यताही नाही, असं व्यक्तव्य खासदार गजानन कीर्तिकर यांनी केलं आहे.ते जालन्यात बोलत होते.

राष्ट्रीय स्तरावर भाजप ३५० खासदार निवडून आणू शकतं.महाराष्ट्राबाहेर शिवसेना नाही, महाराष्ट्रातील लोकसभेच्या ४८ पैकी २६-२२ असं वाटप झालं होतं. आमचे १८ आले ४ पडले, त्यांचे २३ आले ३ पडले ही स्थिती आहे.राष्ट्रीय स्तरावर जरी भाजपनं ३५० खासदार निवडून आणले तरी महाराष्ट्रात त्यांची स्थिती वेगळी आहे, असं कीर्तिकर म्हणाले.

ठाकरेंनी २०१९ला तिकीट दिलं आणि जिंकवून आणलं तरी कीर्तिकरांनी साथ सोडली

तुमचं राजकारण-समाजकारण झालं असेल, पण आम्ही आमचा माणूस गमावला; श्री सदस्यांच्या नातेवाईकांनी सरकारला सुनावलं

महाराष्ट्रात भाजप कमकुवत आहे, असं म्हणता येणार नाही. मात्र, महाराष्ट्रात ती शिवसेना पेक्षा मजबूत आहे असही आम्ही मान्य करणार नाही, असं कीर्तिकर स्पष्टच बोलले.

२०१९ ला विधानसभा निवडणुकीत शिवसेना भाजपचे जागावाटप झाले होते. त्यावेळी शिवसेनेला १२६ आणि भाजपला १६२ जागा असं वाटप झालं होत. १६२ मधून १०५ आले आणि १२६ मधून आम्ही ५६ जण निवडून आलो. यावेळचा फॉर्म्युला ही १०० टक्के तसाच असला पाहिजे, असं गजानन कीर्तिकर म्हणाले.

खारघरनंतर आणखी एका जिल्ह्यात ‘सूर्य कोपला’, उन्हात काम करणाऱ्या तिघांचा जीवच गेला…

आमच्याकडे उमेदवार तयार आहेत,एका एका ठिकाणी ४/४ उमेदवार रांगेत आहेत, असही किर्तीकर म्हणाले.अजित पवारांनी पहाटेला भाजप सोबत जाऊन सरकार स्थापन करण्याचा एक प्रयत्न केल्याचं आपण पाहिलं आहे . आमचा काही विरोध नाही.राष्ट्रवादीचे काही आमदार घेऊन अजित पवार जर बाहेर पडत असतील तर आम्ही त्यांचं स्वागत करू असही किर्तीकर म्हणाले होते.

कार्यकर्त्यांना शब्द दिला, संशयाचं धुकं हटवलं; अजित पवारांच्या पत्रकार परिषदेतील १० मोठे मुद्दे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed