रविवारी मध्यरात्री तो आपल्या रूममध्ये गेला. आतून त्याने कडी लावली आणि त्यानंतर लोखंडी रॉडला दोरी बांधून त्याने गळफास घेतला. सकाळी उशिरापर्यंत दरवाजा बंद असल्याने कुटुंबियांनी दरवाजा ठोठावला. मात्र काही प्रतिसाद मिळत नव्हता. शेवटी दरवाजा तोडून आत प्रवेश केल्यानंतर प्रशांतचा मृतदेह लटकलेल्या अवस्थेत आढळून आला.
पिकाचे पैसे आले की मुलीच लग्न करु अशी त्या बापाची इच्छा; पण उद्धवस्त झालेलं सोयाबीन पाहून शेतकऱ्याची आत्महत्या
आत्महत्या करण्यापूर्वी प्रशांतने चिठ्ठी देखील लिहिली होती. घटनेची माहिती मिळाल्यानंतर लोहा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी पंचनामा करुन आकस्मिक मृत्यूची नोंद केली. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
काय लिहिलं होतं चिठ्ठीत?
अण्णा आणि आई माफ करा मला, मी कायमचं तुम्हाला सोडून जायचा निर्णय घेतला आहे. हे टोकाचं पाऊल कोणत्या मुलीसाठी किंवा तिच्या प्रेमासाठी उचलत नाही. मी कोणत्याही मुलीवर प्रेम करत नाही. एवढा मोठा निर्णय घेण्याचं कारण एकच आहे, की मी माझ्या अनसक्सेस लाईफला कंटाळलो आहे. मला जगण्याचं कोणतंच कारण समोर दिसत नाही. माझ्या समोर कोणतेच ध्येय उरले नाही, तसेच कुठल्याही प्रकारची मेहनत घेण्याची इच्छा नाही. अण्णा इथून पुढे तरी आईला त्रास देऊ नका. माझी आखरी इच्छा समजा. अशा अनेक भावना त्याने चिठ्ठीत लिहून आपलं आयुष्य संपवलं आहे.