• Sat. Sep 21st, 2024
मोबाईल हॅक, तरुणीच्या Google Pay, PhonePe मधून पैसे गायब; चोरट्यांनी लाटले साडेतीन लाख

सातारा : कऱ्हाड येथील महाविद्यालयीन तरुणीचा मोबाईल ‘हॅक’ करून पैसे चोरी केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. तरुणीच्या गुगल पे आणि फोन पे वरून बँक खात्यातील तब्बल ३ लाख ७० हजार रुपये अज्ञाताने काढून घेतले असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. याबाबत संबंधित युवतीने मल्हारपेठ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. फिर्यादीवरून अज्ञातावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ऑनलाईन गेमच्या नादात ४० लाख घातले, बापाची शेती विकली, राजाचा रंक झाला


याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मल्हारपेठ विभागातील एका गावात राहणारी तरुणी महाविद्यालयीन शिक्षण घेते. तिचं स्टेट बँकेच्या पाटण शाखेत बचत खातं आहे. तसंच पोस्ट पेमेंट बँक खातंही आहे. संबंधित दोन्ही खात्यावर तिने रक्कम ठेवली होती. तसंच मोबाईलमध्ये तिने दोन सिमकार्ड क्रमांकांवर गुगल पे आणि फोन पे सुरू करून त्याद्वारे ती गरजेनुसार ऑनलाईन व्यवहार करत होती.

पोलीस ठाण्यातून बोलतोय; ड्रग्जच्या पार्सलमध्ये तुमचं नाव आलंय, पुण्यात इंजिनिअर तरुणीला २५ लाखांचा गंडा
दरम्यान, २७ मार्च ते १४ एप्रिल या कालावधीत त्या तरुणीच्या मोबाईलचा अज्ञात व्यक्तीने दुसऱ्या डिव्हाईसला ॲक्सेस घेतला. दुसऱ्या डिव्हाईसवरून संशयित आरोपीने युवतीच्या मोबाईलचा ताबा घेत तिच्या गुगल पे आणि फोन पे वरून स्टेट बँक खात्यातील २ लाख ८० हजार रुपये तसंच पोस्ट पेमेंट बँक खात्यातील ९० हजार रुपये असं एकूण ३ लाख ७० हजार रुपये काढून घेतले. शुक्रवार १४ एप्रिल रोजी हा प्रकार तिच्या लक्षात आल्यानंतर संबंधित तरुणीने याबाबतची तक्रार मल्हारपेठ पोलीस ठाण्यात दिली.

एका सिगारेटचा धूर दोन लाखांचा? लोअर परळमधील तरुणीला QR Code स्कॅन पडला भारी
दरम्यान, मोबाईलचा ॲक्सेस घेऊन ‘फोन पे’ आणि ‘गुगल पे’द्वारे करण्यात आलेला विभागातील हा पहिलाच गुन्हा असल्यामुळे पोलीसही चक्रावले आहेत. या गुन्ह्याची नोंद मल्हारपेठ पोलीस ठाण्यात झाली आहे. पोलीस निरीक्षक विकास पाडळे तपास करत आहेत.

राज्यात अनेक ठिकाणी ऑनलाइन फसवणुकीचे अनेक गुन्हे समोर आले आहेत. त्यामुळे कोणताही व्यवहार करताना सावधगिरीने करणं गरजेचं आहे. कोणतीही OTP मागितल्यास तो कोणालाही देऊ नये. तसंच व्यवहार करताना क्यूआर कोड स्कॅन करताना संपूर्ण डिटेल्स तपासणं गरजेचं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed