अमोल मिटकरी म्हणाले की, आजवर महाराष्ट्र भूषण पुरस्कार देण्याची सुद्धा एक पद्धत होती. मात्र, या सरकारने अध्यात्माचे राजकारण करत नाहक अनेक लोकांचा बळी घेतला आहे. मृत्यूला जबाबदार ठरलेल्या सरकारवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झालाच पाहिजे ही मागणी आता सद्गुरू परिवाराने जोर लाऊन धरली पाहिजे, असंही मिटकरी म्हणाले.
कोटी रुपयांचं बजेट, ढिसाळ नियोजनाने श्री सदस्य दगावले; अजित पवारांची मुख्यमंत्र्यांवर टीका
या सरकारनं महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्यासाठी इतका पैसा खर्च केला मग कार्यक्रमासाठी आलेल्या लोकांची व्यवस्था का करण्यात आली नाही, असा सवाल देखील अमोल मिटकरी यांनी केला. मुख्यमंत्री, केंद्रीय गृहमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांसाठी व्हीआयपी व्यवस्था करण्यात आली होती. तिथं आलेल्या भक्त संप्रदायाची व्यवस्था करता आली नाही का? असा सवाल मिटकरी यांनी केला. मुख्यमंत्री म्हणतात राजकारण करु नका पण अहो हा विषय राजकारणाचा नाही माणसं मेलीत, असं मिटकरी म्हणाले.
सरकारवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा
अमोल मिटकरी यांनी यावेळी राज्य सरकारवर टीका केली. १२ जणांच्या मृत्यूला कारणीभूत असलेल्या सरकारवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी त्यांनी केला.अमोल मिटकरी यांनी महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्यात उष्माघातानं १२ जणांचा मृत्यू झाल्या प्रकरणी राज्यपाल रमेश बैस यांची भेट घेणार असल्याचं देखील म्हटलं.
सुधीर मुनगंटीवारांचा राजीनामा घ्या : अंबादास दानवे
विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अमोल मिटकरी यांनी भाजप नेते सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या विभागाचा तो कार्यक्रम होता. त्यामुळं घडलेल्या घटनेची जबाबदारी घेऊन मुनगंटीवार यांचा राजीनामा घ्यावा, असं अंबादास दानवे म्हणाले.