लांजा:रत्नागिरी जिल्ह्यात उद्धव ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे. लांजा राजूर मतदारसंघाचे आमदार राजन साळवी यांच्या गटातील लांजा नगरपंचायतीच्या उपनगराध्यक्ष पूर्वा मुळे यांच्यावर दाखल केलेला अविश्वास ठराव बहुमताने मंजूर झाला आहे. उद्धव ठाकरे गटाच्या लांजा नगरपंचायतीच्या उपनगराध्यक्ष पुर्वा मुळे यांच्या विरोधात अविश्वास १३ विरुद्ध 0 मतांनी अविश्वास ठराव मंजूर झाला आहे. भाजपचे तीन,काँग्रेसचे दोन व अपक्ष दोन या नगरसेवकांनीही या अविश्वास ठरवाच्या बाजूने मतदान केले आहे. काँग्रेसच्या दोन नगरसेवकांनी शिंदे गटाला सहकार्य केल्याने जिल्हयात महाविकास आघाडीलाही मोठा धक्का बसला आहे.
अविश्वास ठराव मंजूर होताच उद्धव ठाकरे सेना आक्रमक झाली आहे. लांजा नगरपंचायतीच्या खाली शिवसेनेचा मोठा जमावनगराध्यक्ष विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. आमदार राजन साळवींना हा मोठा धक्का मानला जात आहे. शिवसेनेच्या शिंदे गटाच्या नगरसेवकांकडून अविश्वास ठराव प्रस्ताव दाखल करण्यात आला होता.

नगराध्यक्षांसह शहर विकास आघाडीतील १४ नगरसेवकांनी गटनेता म्हणून पूर्वा मुळे यांना बजावलेला व्हिप झुगारला आहे.शिंदे गटाचे पाच नगरसेवक, काँग्रेसचे दोन, अपक्ष दोन आणि भाजपचे तीन नगरसेवक असो १२ नगरसेवक आणि नगराध्यक्षांनी केलं विरोधात मतदान केले आहे.
दरम्यान या सगळ्यानंतर पूर्वा मुळे यांनी आपल्यावर शिंदे गटाचा दबाव असल्याचे म्हटले. मनमानी पद्धतीने आपल्या विरोधात ही कारवाई केल्याचा आरोप लांजा नगरपंचायतीच्या उपनगराध्यक्षा पूर्वा मुळे यांनी केला आहे. तर उपनगराध्यक्षांच्या मनमानी विरोधात ही अविश्वास ठरावाची कारवाई केल्याचे सष्टीकरण लांजा नगरपंचायतीचे नगराध्यक्ष मनोहर बाईत यांनी दिले आहे.