• Mon. Nov 25th, 2024

    विनामस्तक धड आढळल्याने नाशिकमध्ये खळबळ; तीन वर्षीय बालिकेचे धड असल्याचा प्राथमिक अंदाज

    विनामस्तक धड आढळल्याने नाशिकमध्ये  खळबळ; तीन वर्षीय बालिकेचे धड असल्याचा प्राथमिक अंदाज

    म. टा. प्रतिनिधी, नाशिक : द्वारका परिसरातील नानावलीजवळील मोकळ्या जागेत बालिकेच्या बेवारस मृतदेहाचे श्वापदांनी लचके तोडल्याची घटना सोमवारी दुपारी उघडकीस आली. एका रहिवासी संकुलाबाहेर मस्तक, दोन्ही हात आणि एक पाय नसलेला बालिकेचे धड आढळल्याने खळबळ उडाली होती.अशी आहे घटना

    काही दिवसांपूर्वी गंगापूर पोलिसांच्या हद्दीत चार महिन्यांच्या बालिकेचा मातेनेच खून केल्यानंतर आता तीन वर्षांच्या बालिकेचा अतिशय भयावह स्थितीत मृतदेह आढळला आहे. सोमवारी दुपारी दीड वाजेच्या सुमारास भद्रकाली पोलिसांना शहजाद शेख या तरुणाने मृतदेहासंदर्भात माहिती दिली. उपायुक्त किरणकुमार चव्हाण, सहायक आयुक्त गंगाधर सोनवणे, भद्रकालीचे वरिष्ठ निरीक्षक दत्ता पवार, दिलीप ठाकूर यांचे पथक घटनास्थळी पोहोचले. मृतदेहाचा शिर, दोन्ही हात व एक पाय नसल्याचे आढळल्यानंतर श्वान पथकाला पाचारण करण्यात आले. हा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत असल्याने जिल्हा रुग्णालयात विच्छेदनासाठी पाठ‌वण्यात आला. जवळच स्मशानभूमी असल्याने श्वापदांनी मृतदेहाचे लचके तोडल्याचा संशय व्यक्त करण्यात आला. मृत्यूचे कारण अस्पष्ट असून, भद्रकाली पोलिस या प्रकरणी पुढील तपास करीत आहेत.

    ‘व्हिसेरा’ ठेवला राखून

    दोन ते तीन दिवसांपूर्वी बालिकेचा मृत्यू झाल्याचा अंदाज शवविच्छेदन करताना वैद्यकीय अधिकाऱ्यांनी वर्तविला. संबंधित धडावर कोणत्याही जखमा नसल्याचे शवविच्छेदन कक्षप्रमुख डॉ. हेमंत घांगळे यांनी सांगितले. ‘व्हिसेरा’ राखून ठेवण्यात आला असून, पुढील तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात आला आहे. या अहवालानंतरच मृत्यूचे खरे कारण स्पष्ट होण्याचा अंदाज आहे.

    केसात गजरा, हातात पद्मश्री पुरस्कार, रवीना टंडन मुंबईत परतली

    या शक्यतांची चर्चा…

    -अंधश्रद्धा अथवा अघोरी प्रथेतून हत्या झाली असावी?
    -बालिकेचा घातपात झाला असावा?
    -बेघरांपैकी एखाद्याची मुलगी श्वापदाने ठार केली असावी?
    -बाहेरून कोणी मृतदेह अथवा धड येथे आणून टाकले असावे?
    -सीसीटीव्हीसह तांत्रिक विश्लेषणाद्वारे तपास सुरू
    -सर्व शक्यतांची पडताळणी करून तपास सुरू

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed