याबाबत खराडी भागातील ५१ वर्षीय व्यावसायिकाने चंदननगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार व्यावसायिक आणि आरोपी नितीन गोते याची एका उपहारागृहात ओळख झाली होती. वर्षभरापूर्वी गोतेने व्यावसायिकाला शेअर बाजारात गुंतवणूक केल्यास दरमहा चांगला परतावा मिळेल, असे आमिष व्यावसायिकाला दाखविले होते. प्रलोभनाला बळी पडून व्यावसायिकाने राहत्या घराची विक्री करुन गोते याला ९९ लाख ७ हजार रुपये दिले होते.
शेअर बाजारात नफा किंवा तोटा जरी झाला तरी दरमहा गुंतवणुकीवर दहा टक्के व्याजदराने परतावा देणार असल्याचे गोते याने व्यावसायिकाला सांगितले होते. व्यावसायिकाने शेअर बाजारातील व्यवहारासंदर्भात उघडलेल्या बँक खात्याची पाहणी केली. तेव्हा त्याला ९९ लाख ७ हजार रुपयांचा तोटा झाल्याचे आढळून आले. व्यावसायिकाने गोतेकडे विचारणा केली. तेव्हा त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर व्यावसायिकाने पोलिसांकडे तक्रार दिली. पोलीस उपनिरीक्षक गोरक्ष घोडके तपास करत आहेत.
महिला पदाधिकाऱ्याला मारहाण, रुग्णालयात जाऊन ठाकरे कुटुंबाकडून रोशनी शिंदेंची विचारपूस