• Sat. Sep 21st, 2024
सभेवरुन परतल्या न् घरात आयुष्य संपवलं, मनमिळाऊ माजी ग्रामपंचायत सदस्येचं टोकाचं पाऊल

रत्नागिरी : गुहागर तालुक्यातील आरे वाकी पिंपळवट ग्रामपंचायतीच्या माजी सदस्या प्राजक्ता देवकर (वय ४९ वर्ष) यांनी आयुष्य संपवलं. ऐन रामनवमीच्या दिवशी गळफास घेऊन देवकर यांनी आत्महत्या केल्याने मोठी खळबळ उडाली आहे. या दुर्दैवी घटनेमुळे आरेगाव परिसरावर शोककळा पसरली आहे. प्राजक्ता देवकर यांना गेले काही महिने अल्पसा आजार झाला होता. त्याचप्रमाणे त्या आर्थिक संकटातही होत्या. त्यामुळे त्यांनी टोकाचे पाऊल उचलत आत्महत्या केली असावी असा प्राथमिक अंदाज आहे.

रामनवमीच्या दिवशी सकाळी गावातील महिलांच्या सभेला त्या गेल्या होत्या. तेथून घरी आल्यावर त्यांनी दुपारी 12 ते सायंकाळी 6 वाजताच्या दरम्यान राहत्या घरात दोरीने गळफास लावून आत्महत्या केली.

घरातील मंडळींच्या ही गोष्ट लक्षात आली. गावात उत्सव सुरु असल्याने अंत्यसंस्कार उरकण्याची तयारी सुरु केली. मात्र गावचे पोलीस पाटील मिलिंद सुर्वे यांनी ही आत्महत्या असल्याने पोलीस येईपर्यंत थांबा असे ग्रामस्थांना सांगितले. घटनेचे गांभीर्य लक्षात घेवून गुहागर पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस निरीक्षक तुषार पाचपुते आपल्या सहकाऱ्यांसह तात्काळ घटनास्थळी दाखल झाले.

भविष्यात अडचणी येवू नयेत म्हणून आपण कायदेशीर प्रक्रिया पार पाडूया अशी विनंती ग्रामस्थांना केली. ही विनंती ग्रामस्थांनी मान्य केल्यावर प्राजक्ता देवकर यांचा मृतदेह पोलीसांनी ताब्यात घेतला व शवविच्छेदनासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र चिखली येथे रात्री पाठवला.

३१ मार्च शुक्रवारी सकाळी शवविच्छेदन झाल्यानंतर प्राजक्ता देवकर यांचा मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. त्यानंतर आरेगावातील स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

कारच्या चावीने जीव घेतला, नाशिकमधील खुनाचं गूढ उकललं, धागेदोरे मुंबई ते हरियाणापर्यंत

दरम्यान या घटनेमुळे आरेगावातील श्रीराम मंदिरात सुरु असलेल्या रामनवमीच्या उत्सवातील सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आले. प्राजक्ता देवकर सात वर्ष ग्रामपंचायतीच्या सदस्य होत्या. गावातील कोणत्याही घरात कोणत्याही कार्यक्रमाचे निमंत्रण मिळाल्यावर हजर राहून त्या घरातील कुटुंबाला मदत करणाऱ्या ग्रामपंचायत सदस्य म्हणून त्यांची ओळख होती. त्यामुळे त्याच्या मृत्यूने संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे.

रामनवमीला डीजे लावण्यास पोलिसांनी रोखलं; दोन युवक थेट विषारी औषध प्यायले

प्राजक्या देवकर यांच्या पश्चात दोन मुलगे, एक मुलगी असा परिवार आहे. गुहागर पोलीस ठाण्यात या घटनेची नोंद करण्यात आली असून अधिक तपास गुहागर पोलीस करत आहेत.

हे बाळ माझ्या मुलाचं नाही, सासूचे शब्द ऐकून सुनेने जीवन संपवलं; सासरच्यांनी चिमुकलीला नेलं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed