पर्वती, वडगाव, वारजे, एसएनडीटी (एचएलआर), लष्कर, भामा आसखेड, चांदणी चौक, पाषाण, बाणेर, चतुःशृंगी आणि होळकर जलकेंद्रांशी संबंधित परिसराला या पाणीपुरवठा बंदचा फटका बसणार आहे. त्यामुळे नागरिकांनी पाण्याचा काटकसरीने वापर करावा, असे आवाहन पाणीपुरवठा विभागाचे मुख्य अभियंता नंदकिशोर जगताप यांनी केले आहे.
Pune Crime : संबंधाच्या हेतूने तिने माझ्या मुलाला किस केलं, पुण्यातील वडिलांची पोलिसात धाव, 21 वर्षीय तरुणीवर गुन्हाउत्सवाच्या तोंडावर खोळंबा
गणेशोत्सवापूर्वी नागरिक घरांची स्वच्छता, रंगरंगोटी, कपडे धुणे आणि सजावटीची तयारी करतात. त्यामुळे या काळात पाण्याची गरज नेहमीपेक्षा अधिक असते. मात्र, एक दिवस पाणीपुरवठा बंद ठेवला जातो आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी कमी दाबाने तसेच उशिरा पाणीपुरवठा होतो. ऐन सणासुदीच्या तयारीत हा खेळखंडोबा नागरिकांसाठी डोकेदुखी ठरत आहे.
पाणीपुरवठा बंद राहणारा भाग :
वडगाव जलकेंद्र व सिंहगड रस्ता परिसर : धायरी, वडगाव बुद्रुक, हिंगणे, आनंदनगर, नरवीर तानाजी मालुसरे रस्ता (सिंहगड रस्ता), कात्रज गावठाण, दत्तनगर, संतोषनगर, आंबेगाव, धनकवडी, भारती विद्यापीठ, कोंढवा बुद्रुक, सुखसागरनगर, येवलेवाडी, खडीमशिन परिसर, बालाजीनगर आदी.
पर्वती व लष्कर :
सहकारनगर, पद्मावती, बिबवेवाडी, महर्षीनगर, मुकुंदनगर, गंगाधाम, सॅलिसबरी पार्क, इंदिरानगर, कोंढवा खुर्द, लुल्लानगर, कौसरबाग, एनआयबीएम, साळुंखे विहार, वानवडी, केदारीनगर आदी.
Pune Fort Murder : कॉलेजचा मित्र, बिल्डरकडे जॉब; केतनच्या हत्येच्या कटाचे बारकावे रितेशला ठाऊक, लोहगड प्रकरणात नवी माहिती उघडवारजे, एसएनडीटी व कोथरूड :
कर्वेनगर, कोथरूड, मयूर कॉलनी, डहाणूकर कॉलनी, पौड रस्ता, प्रभात रस्ता, भांडारकर रस्ता, लॉ कॉलेज रस्ता, सेनापती बापट रस्ता, गोखलेनगर, औंध, बोपोडी, वारजे माळवाडी, शिवणे, उत्तमनगर, बावधन आदी.
भामा आसखेड व नगर रस्ता:
कळस, धानोरी, लोहगाव, टिंगरेनगर, विमाननगर, वडगाव शेरी, कल्याणीनगर, विश्रांतवाडी, फुलेनगर, येरवडा, खराडी आदी.
चांदणी चौक, पाषाण, बाणेर व चतुः शृंगी :
बावधन, पाषाण, सुतारवाडी, सोमेश्वरवाडी, सुस रस्ता, बाणेर, बालेवाडी, पॅनकार्ड क्लब रस्ता,पुणे विद्यापीठ परिसर, खडकी, औंध गाव आदी.
होळकर जलकेंद्र व खडकी
: मुळा रस्ता, खडकी कँटोन्मेंट, एमईएस, एचई फॅक्टरी आणि हरीगंगा सोसायटी परिसर.