• Wed. Sep 9th, 2026

Mumbai Ganeshotsav 2026: गणेशोत्सव आला की गणेशभक्तीचा आणि मनोरंजनाचा कार्यक्रम म्हणजे भजन पण बदलत्या प्रेक्षकवर्गाच्या मागण्या आणि मनोरंजनात सगळ्यांना सामावून घेण्याच्या उद्देशाने भजनासोबतच पपेट शो , बबल्स शो यांचे आयोजन करण्यात आले आहे.

(फोटोमहाराष्ट्र टाइम्स)
म.टा.प्रतिनिधी, मुंबई:गणेशोत्सव म्हटला की भक्ती, उत्साह आणि सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल आलीच. यंदाही सार्वजनिक गणेश मंडळे, गृहनिर्माण सोसायट्या, शैक्षणिक संस्था आणि सामाजिक संघटनांकडून विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

प्रेक्षकांच्या आवडीनुसार कार्यक्रमांच स्वरूप

मात्र, पारंपरिक भजन, कीर्तन, प्रवचन, भारूड, लावणी यांसोबतच जादूचे प्रयोग, पपेट शो , बबल्स शो, खेळाधारित कार्यक्रम, विज्ञानाधारित प्रयोग आणि संवादात्मक सादरीकरणांना वाढती मागणी आहे. प्रेक्षकांच्या बदलत्या आवडीनुसार कार्यक्रमांचे स्वरूप बदलत असल्याने अनुभवी आणि व्यावसायिक कलाकारांना पसंती मिळत आहे.

प्रेक्षकांचा सहभाग महत्त्वाचा

पूर्वी गणेशोत्सवातील सांस्कृतिक कार्यक्रम प्रामुख्याने पारंपरिक कलाप्रकारांभोवती केंद्रित असायचे. आता मात्र मनोरंजनासोबत प्रेक्षकांचा सहभाग वाढवणाऱ्या कार्यक्रमांकडे आयोजकांचा कल आहे.

मुलांसाठीच्या कार्यक्रमांच आयोजन

वाद्यवृंद, एकपात्री प्रयोग, लोककला सादरीकरण यांसोबतच पपेट शो, बबल्स शो, खेळाधारित कार्यक्रम आणि विज्ञानाधारित प्रयोगांचे आयोजन केले जात आहे. विशेषतः मुलांसाठीच्या कार्यक्रमांमध्ये त्यांचा थेट सहभाग असावा, यावर भर दिला जात आहे.

कार्यक्रमांची आखणी

डिजिटल माध्यमांमुळे विविध प्रकारचे मनोरंजन सहज उपलब्ध झाले आहे. त्यामुळे प्रत्यक्ष कार्यक्रमात प्रेक्षकांना वेगळा अनुभव मिळावा, यासाठी मंडळे आणि सोसायट्यांकडून कार्यक्रमांची आखणी केली जात आहे.

कार्यक्रमांना विशेष महत्त्व

केवळ रंगमंचावर सादरीकरण करण्याऐवजी प्रेक्षकांनाही कार्यक्रमाचा भाग करून घेणाऱ्या कलाप्रकारांना अधिकप्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे संवादात्मक आणि सहभागाधारित कार्यक्रमांना विशेष महत्त्व आले आहे.

कार्यक्रमांचा दर्जा आणि कलाकारांची निवड

गणेशोत्सवातील कार्यक्रमांची संख्या वाढत असताना वेळेचे नियोजनही आयोजकांसाठी महत्त्वाचे ठरत आहे. कमी वेळेत प्रभावी सादरीकरण, तांत्रिक तयारी, प्रेक्षकांशी संवाद आणि कार्यक्रमाचा दर्जा या बाबी लक्षात घेऊन कलाकारांची निवड केली जात आहे. त्यामुळे केवळ प्रसिद्धीपेक्षा कार्यक्रमाचा अनुभव आणि व्यावसायिक पद्धतीने सादरीकरण करण्याची क्षमता यांना प्राधान्य दिले जात असल्याचे चित्र आहे.

Maharashtra Timesscrap rickshaw: बदलापूर, अंबरनाथमध्ये स्क्रॅप रिक्षांचा सुळसुळाट; विनापरवाना,अल्पवयीन चालक चालवतात रिक्षा, प्रवाशांचा जीव धोक्यात

सांस्कृतिक कार्यक्रमांचे स्वरूप बदलत आहे .

गणेशोत्सवाच्या निमित्ताने भक्तीबरोबरच कला आणि मनोरंजनाचीही मेजवानी मिळत असल्याने रसिकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. पारंपरिक कलांना आधुनिक सादरीकरणाची जोड आणि नव्या कलाप्रकारांना मिळणारा प्रतिसाद यामुळे गणेशोत्सवातील सांस्कृतिक कार्यक्रमांचे स्वरूप बदलत असून, उत्सवाची सांस्कृतिक रंगतही वाढत आहे.

Maharashtra TimesCSMT–Sawantwadi train: सीएसएमटी-सावंतवाडी रेल्वेची प्रतीक्षा कायम, उद्घाटन झालं, मुहूर्त कधी? आरक्षणाची घोषणाच नाही

‘वेगळे काहीतरी’ करण्याचा प्रयत्न

गणेशोत्सव हा नवोदित आणि हौशी कलाकारांसाठीही मोठे व्यासपीठ आहे. मात्र, दरवर्षीच्या कार्यक्रमांमध्ये वेगळेपणा आणण्यासाठी आयोजकांकडून नव्या संकल्पनांचा शोध घेतला जात आहे. भक्ती, मनोरंजन आणि सामाजिक संदेश यांची सांगड घालत पर्यावरण जनजागृती, महिला सक्षमीकरण आणि बालसंस्कार अशा विषयांवर आधारित कार्यक्रमही आयोजित केले जात आहेत. त्यामुळे उत्सवाच्या सांस्कृतिक बाजूला नवा आयाम मिळत आहे.

कांचन परुळेकर

लेखकाबद्दलकांचन परुळेकरकांचन परुळेकर महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये कन्सलटंट पदावर कार्यरत आहेत. कांचन स्थानिक बातम्या, पायाभूत सुविधा, बांधकाम आणि विकास प्रकल्प यासाठी लिखाण करतात. त्यांच्या पत्रकारितेच्या प्रवासाला सुरुवात ही महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमधून झाली. मार्च २०२६ मध्ये महाराष्ट्र टाइम्सच्या व्हिडिओ विभागात त्यांनी इंटर्न म्हणून काम केले. सुरुवातीला त्यांनी युट्यूब, फेसबुक आणि इन्स्टाग्रामसाठी कन्टेंट तयार करताना व्हिडिओ आणि लेख लिहिले आहेत. महाराष्ट्रातील राजकीय घडामोडी, स्थानिक बातम्या आणि क्राइमसह स्पोर्ट्सवर इत्यादी विषयांचे वाचन आणि लेखन करण्याची त्यांना विशेष आवड आहे.

कांचन यांचे संपूर्ण शिक्षण मराठी माध्यमातून झाले असून पत्रकारितेची आवड असल्याने त्यांनी कोकण ते मुंबई असा शैक्षणिक प्रवास केला. २०२५ मध्ये बॅचलर्सचे शिक्षण गावी पूर्ण केले. इकोनॉमिक्स या विषयातून पद्वी घेतली. लिखाणाची आवड, संवाद साधण्याचे कौशल्य आणि पत्रकारितेची आवड समजून घेऊन साठ्ये कॉलेज विलेपार्ले येथे वृत्तपत्रविद्या आणि संवाद या विषयात त्यांनी पद्व्युत्तर शिक्षणासाठी प्रवेश घेतला.

महाविद्यालयीन काळात कला आणि नाटक विषयात विशेष आवड असल्याने त्यांनी अभिनयदेखील केले आहे. काही नाटक त्यांनी लिहिले आहेत. मुंबई विद्यापीठाच्या युथ फेस्टिवलमध्ये त्यांना अभिनयासाठी ब्रॉन्झ आणि सिल्व्हर मेडल देण्यात आले आहेत. कविता आणि लेख लिहिण्याची आवड असल्याने शाळा ,कॉलेज मासिक अंकात त्यांचे लेख देखील प्रसिध्द झाले आहेत.

२०२६ मध्ये महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन सोबत जोडल्या गेल्यानंतर त्यांची पत्रकारितेची आवड अगदी स्पष्ट झाली. बोलण्यातला स्पष्टपणा लिखाणातली पारदर्शकता अधिक नव्याने समजत गेली. तीन महिन्यांच्या इंटर्नशिप नंतर त्या आता कन्सलटंट पदावर म.टा. समुहात सहभागी झाल्या आहेत. पारदर्शकता आणि विश्वासार्ह माहिती वाचकांपर्यंत पोहचवण्याचं काम त्या करत आहेत.… आणखी वाचा