• Mon. Nov 25th, 2024
    मधमाश्यांचे मोहोळ उठले, बघता-बघता पित्याच्या चेहऱ्याला डंख, लेकाच्या डोळ्यादेखत तडफडून अंत

    जळगाव : जिल्ह्यातील पाचोरा तालुक्यात नगरदेवळा येथील पिता पुत्रावर मधमाश्यांनी हल्ला केल्याची घटना घडली आहे. यात पित्याचा मृत्यू झाला असून जखमी मुलाला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सैय्यद सबदर सैयद इस्माईल (वय ५८ वर्ष) असे मयत वडिलांचे नाव आहे. मुलगा आबिद सैय्यद सबदर हा जखमी असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत.याबाबत सविस्तर वृत्त असे की, सैय्यद सबदर सैयद इस्माईल व त्यांचा मुलगा आबिद सैय्यद सबदर हे दोघे कामानिमित्त बाहेरगावी गेले होते. शुक्रवारी दुपारी चार वाजताच्या सुमारास रोजंदारीचे काम करून बनोटी शिंदोळ मार्गाने परतत असताना शिंदोळ गावाजवळ रस्त्यालगत असलेल्या झाडावर बसलेल्या मधमाश्या अचानक उठल्या.

    अचानक झालेल्या हल्ल्यात सैयद सबदर सैयद इस्माईल यांच्या तोंडाला मधमाश्या चावल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला तर मुलगा आबीद सैयद सबदर यालाही माशांनी चावा घेतल्याने तो गंभीर जखमी झाला. घटनेची माहिती मिळाल्याने परिसरातील गावकऱ्यांनी घटनास्थळाकडे धाव घेतली. व जखमी आबीद याला तातडीने पुढील उपचारासाठी जळगाव येथील रुग्णालयात हलविण्यात आले. त्यावर उपचार सुरू आहेत.

    एकच वेळ, ठिकाण वेगवेगळं, तरुण-तरुणीने आयुष्य संपवलं, दोघांचं नातं समोर आलं नि सारेच हळहळले

    डोळ्यादेखत पित्याच्या मृत्यूने मुलाला बसला धक्का

    सैय्यद इस्माईल हे मजुरी करून आपला आपल्या कुटुंबियांचा उदरनिर्वाह करीत होते. मयत सैय्यद इस्माईल यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, तीन मुली असा मोठा परिवार असून त्यांची आर्थिक परिस्थिती हलाखीची असल्याने शासनाकडून त्यांच्या परिवारास आर्थिक मदत मिळावी अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

    रामनवमीला डीजे लावण्यास पोलिसांनी रोखलं; दोन युवक थेट विषारी औषध प्यायले

    दरम्यान घटनेची माहिती मिळाल्यावर पोलिसांनीही घटनास्थळ गाठले. पंचनामा करत मृतदेह रुग्णालयात हलविला. दरम्यान डोळ्या देखत काही क्षणात पित्याचा मृत्यू झाल्याने मुलाला मोठा धक्का बसला आहे, तर दुसरीकडे घरातील कर्त्या पुरूषाच्या मृत्यूने गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.

    हे बाळ माझ्या मुलाचं नाही, सासूचे शब्द ऐकून सुनेने जीवन संपवलं; सासरच्यांनी चिमुकलीला नेलं

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *