• Wed. Sep 9th, 2026

BMC canteen Food prices:नाश्ता, जेवण, थंड पेयांच्या दरात ऑक्टोबरनंतर २० रुपयांपर्यंत वाढ होणार आहे. सर्व २६ वॉर्डांमधील उपाहारगृहातील दर वाढणार आहेत.

(फोटोमहाराष्ट्र टाइम्स)
म.टा.खास. प्रतिनिधी, मुंबई : मुंबई महापालिका मुख्यालयासह सर्व २६ वॉर्डांमधील उपाहारगृहांतील खाद्यपदार्थांचे दर ऑक्टोबरनंतर वाढणार आहेत. नाश्ता, जेवण आणि थंड पेयांच्या दरात १ रुपयापासून २० रुपयांपर्यंत वाढ होणार आहे. या उपाहारगृहाचे कंत्राट ऑक्टोबरमध्ये संपत असून निविदा प्रक्रियेतून नव्या कंत्राटदाराची नियुक्ती केली जाणार आहे.

तीन वर्षांत खाद्यपदार्थांच्या दरात वाढ नाही

मुख्यालयातील मोठ्या उपाहारगृहाप्रमाणेच २६ वॉर्डांमध्येही लहान उपाहारगृहे आहेत. प्रत्येक वॉर्डसाठी स्वतंत्र कंत्राटदार नियुक्त केला जातो. गेल्या तीन वर्षांत खाद्यपदार्थांच्या दरात वाढ झालेली नाही. त्यामुळे आता दर दहा टक्क्यांहून अधिक वाढवले जाणार आहेत. या दरवाढीत मेदू वडा, भजी, मिसळ, उत्तप्पा, वडा, पोहे, शिरा, ढोकळा, व्हेज सँडविच आणि दही वडा आदी पदार्थांचा समावेश आहे.

नॉनव्हेज पदार्थांच्या किमतीतही वाढ

सध्या या पदार्थांचे दर १२, १८, २४ आणि ३० रुपये आहेत. १५० मिली चहाचा दर १२ रुपयांवरून १०० मिलीमागे १० रुपये होणार आहे. मुख्यालयातील साध्या जेवणाचा दर ३० रुपयांवरून साधारण ४० रुपये, तर ४८ रुपयांची डिलक्स थाळी १५ ते २० रुपयांनी महागणार आहे. व्हेज आणि नॉनव्हेज पदार्थांच्या किमतीतही वाढ होणार आहे.

Maharashtra TimesMumbai Ganeshotsav 2026: यंदाच्या गणेशोत्सवाला पारंपरिकतेसोबत नाविन्याचा साज;भजनासोबतच ‘पपेट शो’ बबल्स शो’चे आयोजन

घाटकोपरमधील उपाहारगृहचालकाकडून पाहणी

मुख्यालयातील उपाहारगृहातील स्वयंपाकगृहात माशांचा प्रादुर्भाव आणि अन्न हाताळणी परिसरातील अपुरी स्वच्छता यांसह ३१पैकी सर्व त्रुटी कायम असल्याने जुलैमध्ये उपाहारगृह सील करण्यात आले होते. त्यानंतर दंड भरून आणि नियमावलींची पूर्तता केल्यानंतर ते पुन्हा सुरू करण्यात आले.

कंत्राट ऑक्टोबरमध्ये संपणार

या पार्श्वभूमीवर दरवाढीच्या निर्णयाची चर्चा होत असतानाच, घाटकोपरमधील एका मोठ्या उपाहारगृहचालकाने मुख्यालयातील उपाहारगृहाची पाहणी करून त्यात रुची दाखवली आहे. त्यामुळे नव्या कंत्राटदाराच्या नियुक्तीपूर्वीच या चालकाची चर्चा महापालिकेत रंगली आहे. मुख्यालयातील उपाहारगृहाचे सध्याचे कंत्राट ऑक्टोबरमध्ये संपत आहे.

Maharashtra Timesscrap rickshaw: बदलापूर, अंबरनाथमध्ये स्क्रॅप रिक्षांचा सुळसुळाट; विनापरवाना,अल्पवयीन चालक चालवतात रिक्षा, प्रवाशांचा जीव धोक्यात
त्यानंतर निविदा काढून नव्या कंत्राटदाराची नियुक्ती केली जाणार आहे. मात्र, त्याआधीच घाटकोपरमधील एका मोठ्या उपाहारगृहचालकाने मुख्यालयातील उपाहारगृहाची पाहणी केली आहे. त्यामुळे महापालिकेतील अनेक अधिकाऱ्यांच्या भुवया उंचावल्या आहेत.

कांचन परुळेकर

लेखकाबद्दलकांचन परुळेकरकांचन परुळेकर महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये कन्सलटंट पदावर कार्यरत आहेत. कांचन स्थानिक बातम्या, पायाभूत सुविधा, बांधकाम आणि विकास प्रकल्प यासाठी लिखाण करतात. त्यांच्या पत्रकारितेच्या प्रवासाला सुरुवात ही महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमधून झाली. मार्च २०२६ मध्ये महाराष्ट्र टाइम्सच्या व्हिडिओ विभागात त्यांनी इंटर्न म्हणून काम केले. सुरुवातीला त्यांनी युट्यूब, फेसबुक आणि इन्स्टाग्रामसाठी कन्टेंट तयार करताना व्हिडिओ आणि लेख लिहिले आहेत. महाराष्ट्रातील राजकीय घडामोडी, स्थानिक बातम्या आणि क्राइमसह स्पोर्ट्सवर इत्यादी विषयांचे वाचन आणि लेखन करण्याची त्यांना विशेष आवड आहे.

कांचन यांचे संपूर्ण शिक्षण मराठी माध्यमातून झाले असून पत्रकारितेची आवड असल्याने त्यांनी कोकण ते मुंबई असा शैक्षणिक प्रवास केला. २०२५ मध्ये बॅचलर्सचे शिक्षण गावी पूर्ण केले. इकोनॉमिक्स या विषयातून पद्वी घेतली. लिखाणाची आवड, संवाद साधण्याचे कौशल्य आणि पत्रकारितेची आवड समजून घेऊन साठ्ये कॉलेज विलेपार्ले येथे वृत्तपत्रविद्या आणि संवाद या विषयात त्यांनी पद्व्युत्तर शिक्षणासाठी प्रवेश घेतला.

महाविद्यालयीन काळात कला आणि नाटक विषयात विशेष आवड असल्याने त्यांनी अभिनयदेखील केले आहे. काही नाटक त्यांनी लिहिले आहेत. मुंबई विद्यापीठाच्या युथ फेस्टिवलमध्ये त्यांना अभिनयासाठी ब्रॉन्झ आणि सिल्व्हर मेडल देण्यात आले आहेत. कविता आणि लेख लिहिण्याची आवड असल्याने शाळा ,कॉलेज मासिक अंकात त्यांचे लेख देखील प्रसिध्द झाले आहेत.

२०२६ मध्ये महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन सोबत जोडल्या गेल्यानंतर त्यांची पत्रकारितेची आवड अगदी स्पष्ट झाली. बोलण्यातला स्पष्टपणा लिखाणातली पारदर्शकता अधिक नव्याने समजत गेली. तीन महिन्यांच्या इंटर्नशिप नंतर त्या आता कन्सलटंट पदावर म.टा. समुहात सहभागी झाल्या आहेत. पारदर्शकता आणि विश्वासार्ह माहिती वाचकांपर्यंत पोहचवण्याचं काम त्या करत आहेत.… आणखी वाचा