• Mon. Nov 25th, 2024
    नितीन गडकरींना १० कोटींच्या खंडणीसाठी धमकी, पुजारीला बेळगावात अटक, नागपुरात रवानगी

    नागपूर : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी धमकी प्रकरणातील आरोपी जयेश कांता उर्फ जयेश पुजारीला पोलिसांनी नागपूरमध्ये आणलं आहे. गडकरींना दोनदा धमकी देणाऱ्या जयेश पुजारीला बेळगाव पोलिसांनी अटक केली होती. तो बेळगावच्या जेलमध्ये जन्मठेपेची शिक्षा भोगत होता.दोन महिन्यांपूर्वी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या कार्यालयात एक कॉल आला होता. गडकरी यांना आलेल्या धमकीमुळे राज्यातील यंत्रणा सतर्क झाली होती. २१ मार्च रोजी परत सकाळी नितीन गडकरी यांच्या जनसंपर्क कार्यालयात धमकीचे तीन फोन आल्याची माहिती समोर आली होती. पुन्हा एकदा गडकरी यांना जयेश पुजारी या नावानेच धमकी आली होती.

    काय आहे प्रकरण ?

    फोनवर बोलणाऱ्या व्यक्तीने १० कोटी रुपयांच्या खंडणीची मागणी केली होती. दरम्यान या प्रकरणात नागपूर पोलिसांनी धंतोली पोलीस स्टेशनमध्ये खंडणी मागणे व धमकी देणे असा गुन्हा दाखल केला. तसेच नागपूर पोलिसांचे एक पथक बेळगावला रवाना झाले होते.

    या प्रकरणात नागपूर पोलिसांनी मंगळुरु येथील रजिया नावाच्या तरुणीला ताब्यात घेतले आहे. तसेच गडकरी यांच्या कार्यालयात आलेला धमकीचा फोन आणि रजियाला करण्यात आलेला फोन हे दोन्ही फोन कॉल बेळगावच्या तुरुंगामधूनच झाल्याची माहिती पोलिसांच्या तपासात समोर आली होते.

    पत्नीसोबत कौटुंबिक वाद, सासूसह तिच्या मानलेल्या मुलीवर संशय, नाशकात जावयाचा दोघींवर हल्ला
    गुन्हे शाखेसह धंतोली पोलिसांचे पथक त्याच्या चौकशीसाठी बेळगाव येथील कारागृहात गेले होते. पोलिसांनी त्याची भेट घेत चौकशीही केली होती. त्यावेळी त्याच्याकडून अनेक व्हीआयपींची नावे असलेली डायरी आणि काही आक्षेपार्ह कागदपत्रे जप्त केली होती.

    मुंबई- पुणे प्रवास महागणार; एक्स्प्रेस वेवरील टोलध्ये मोठी वाढ, ट्रॅव्हल्सवाल्यांचा संताप

    दरम्यान चौकशीवेळी तो सातत्याने ‘मला येथे राहायचे नसून मला दुसऱ्या कोणत्याही गुन्ह्यात अडकवून येथून बाहेर काढा’ अशी मागणी तो करीत होता. मंगळवारी पुन्हा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या कार्यालयात बेळगाव येथील कारागृहातून फोन आला. यावेळी त्याने गडकरी यांचा घातपात करेन अशी धमकी देत, मी ‘डी’ गॅंग (दाऊद) टोळीचा सदस्य असल्याची बतावणी करण्यात आली होती.
    फडणवीसांच्या आदेशाने २०१९ मध्ये पहिलं बंड, तानाजी सावंतांचा दावा, १५० बैठका घेत आमदारांना वळवलं

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed