• Mon. Nov 25th, 2024
    मोठी बातमी: राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळांना करोनाची लागण

    नाशिक : राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते आणि माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांना करोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. छगन भुजबळ यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्याची माहिती वैद्यकीय सूत्रांकडून मिळाली आहे. काल छगन भुजबळ येवला दौऱ्यावर असताना त्यांना अचानक त्रास होऊ लागला होता. काल दौरा अर्धवट सोडून त्यांनी तपासणी केली होती.काल छगन भुजबळ हे येवल्यात असताना त्यांची प्रकृती बिघडली. थंडी ताप वाढल्याने त्यांना तातडीने अपोलो हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. तपासणी करून त्यांना डिस्जार्ज री सोडण्यात आले आहे. परंतु त्यांचा करोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, भुजबळ हे एका कार्यक्रमाच्या निमित्ताने येवल्याला गेले होते. येवल्यावरून परत येत असताना अचानक त्यांची तब्येत बिघडली. ताप आणि थंडी वाढल्यामुळे त्यांना अस्वस्थ वाटू लागले. त्यांना तातडीने वाटेत अपोलो हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी तपासणी केली त्यानंतर त्यांना घरी जाण्यास मुभा दिली.

    संजय शिरसाटांना ‘ते’ वक्तव्य भोवणार? सुषमा अंधारेंची महिला आयोगाकडे तक्रार; तात्काळ कारवाईची मागणी
    “माझी कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे. गेल्या दोन-तीन दिवसांत माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांना विनंती आहे की, आपल्याला काही लक्षणे आढळून आल्यास ताबडतोब करोना चाचणी करून घ्यावी. माझी प्रकृती उत्तम असून काळजी करण्याचे कारण नाही. परंतु कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व नागरिकांनी योग्य ती काळजी घ्यावी. मास्क आणि सॅनिटायझरचा वापर करावा”, असं ट्वीट करत त्यांनी माहिती दिली आहे.

    काल त्यांची तपासणी करून त्यांना डिस्जार्ज देण्यात आला होता. त्यावेळी त्यांची करोना चाचणी करण्यासाठी सँम्पल्स घेण्यात आले होते. त्यांचा आता करोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. सध्या छगन भुजबळ हे नाशिक येथील त्यांच्या निवासस्थानी आहेत. त्यांचा करोना अहवाल पॉझिटिव्ह आला असला तरी त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती मिळाली आहे.

    दरम्यान, करोना साथीच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेत कोविडचा हॉटस्पॉट ठरलेल्या मुंबईत पुन्हा एकदा रुग्णांची संख्या वाढताना दिसत आहे. या पार्श्वभूमीवर मुंबई महानगरपालिका आणि प्रशासनाकडून खबरदारीचा उपाय म्हणून महत्त्वाची पावले उचलली आहेत.

    PF Interest Rate: पीएफ इंटरेस्ट रेट वाढल्यावर तुम्हाला कसं आणि किती मिळणार व्याज? असा आहे कॅल्क्युलेशन

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *