• Fri. Sep 18th, 2026

Jalgaon Crime News : तपासादरम्यान पोलिसांना माहिती मिळाली की, वैजयंती माळी बेपत्ता झाल्याच्या दिवसापासूनच त्यांचा भाचा प्रशांत माळी हा देखील गावातून अचानक गायब झाला होता. पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची अत्यंत बारकाईने तपासणी केली.

पारोळा करंजी सोन्याच्या दागिन्यांमुळे वृद्ध महिलेची हत्या(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
निलेश पाटील, जळगाव : आईसमान मानणाऱ्या 85 वर्षीय वृद्ध मावशीचा केवळ सोन्याच्या दागिन्यांसाठी आणि डोक्यावर झालेलं कर्ज फेडण्यासाठी पोटच्या मुलासारख्या बहिणीच्या मुलानेच निर्घृण खून केल्याची धक्कादायक घटना पारोळा तालुक्यातील करंजी येथे उघडकीस आली आहे. खून केल्यानंतर आरोपीने वृद्ध महिलेचा मृतदेह कारच्या डिक्कीत टाकून तब्बल 24 तास फिरवला आणि शेवटी धुळे महामार्गावरील एका ड्रेनेजच्या सिमेंट गॅपमध्ये फेकून दिला. तब्बल 35 दिवसांच्या अथक तपासानंतर जळगाव पोलिसांनी या गुन्ह्याचा छडा लावत आरोपी भाच्याला बेड्या ठोकल्या आहेत.

घटना काय होती?

पारोळा तालुक्यातील करंजी येथील रहिवासी वैजयंती गणपत माळी (वय 85) या पतीच्या निधनानंतर घरात एकट्याच राहत होत्या. त्यांना स्वतःचे अपत्य नसल्यानं त्या आपल्या सख्या बहिणीचा मुलगा प्रशांत उत्तम माळी याला मुलाप्रमाणे मानत होत्या आणि त्याला वेळोवेळी आर्थिक मदतही करत होत्या. 3 ऑगस्ट सोमवारी रोजी वैजयंती माळी या आपल्या घरातून अचानक बेपत्ता झाल्या. अनेक दिवस शोध घेऊनही न सापडल्यानं 9 ऑगस्ट रविवारी रोजी पारोळा पोलीस ठाण्यात त्या हरवल्याची नोंद करण्यात आली. तपासादरम्यान संशय वाढल्यानं 19 ऑगस्ट बुधवार रोजी पारोळा पोलिसांत अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला.

Maharashtra TimesNagpur News : मैकबेथने खऱ्या मित्राला संपवलं, हे शेक्सपियरचं नाटक नाही, वास्तव आहे, आनंदात एकत्र दारु प्यायले अन् जीव घेतला

पोलिसांचा संशय बळावला

तपासादरम्यान पोलिसांना माहिती मिळाली की, वैजयंती माळी बेपत्ता झाल्याच्या दिवसापासूनच त्यांचा भाचा प्रशांत माळी हा देखील गावातून अचानक गायब झाला होता. पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची अत्यंत बारकाईने तपासणी केली. 3 ऑगस्ट सोमवारी रोजी सकाळी 6 वाजेच्या सुमारास प्रशांत करंजी गावात आला होता. एका फुटेजमध्ये वैजयंती माळी या घाईघाईने घराबाहेर पडून एका कारमध्ये बसताना दिसून आल्या. तपासात समोर आलं की, प्रशांतवर एचडीएफसी बँकेचे कर्जाचे हप्ते आणि लोकांची उधारी होती. हे कर्ज फेडण्यासाठी त्याची नजर मावशीच्या अंगावरील सोन्याच्या दागिन्यांवर होती.

35 दिवसांनंतर धुळ्यातून मुसक्या आवळल्या

घटना घडल्यापासून आरोपी प्रशांत पोलिसांना गुंगारा देत फरार झाला होता. मात्र, जळगाव पोलिसांच्या पथकाने मानवी गुप्तवार्ता आणि तांत्रिक तपासाच्या आधारे गोपनीय माहिती मिळवत 12 सप्टेंबर शनिवारी रोजी धुळे येथून प्रशांतला शिताफीने ताब्यात घेतलं. प्रशांतने मावशी वैजयंती यांना ‘साडूच्या वडिलांचं निधन झालं असून अंत्यविधीसाठी शिरसोलीला जायचं आहे’, असं खोटं सांगून विश्वासात घेतलं आणि कारमध्ये बसवलं. गाडी धुळे जिल्ह्यातील मुकटीपासून 7-8 किमी अंतरावर आल्यावर प्रशांतने त्यांच्याकडे सोन्याचे दागिने मागितले. वैजयंती यांनी विरोध केला असता त्यांच्यात झटापट झाली आणि त्या निपचित पडल्या. त्यानंतर प्रशांतने कापडाच्या साहाय्याने त्यांचा गळा आवळून खून केला.

Maharashtra TimesBaramati Crime : चोरीसाठी घरात शिरला, बेडरुममध्ये घुसून महिलेला संपवलं, गर्भवती महिलेवर जखमी अवस्थेत अत्याचार; बारामतीमधील वैशाली पवार प्रकरणात ट्विस्ट

मृतदेह घेऊन कारमध्ये फिरला

खून केल्यानंतर त्याने मावशीच्या अंगावरील सर्व दागिने काढून घेतले. रात्री मृतदेह कारच्या डिक्कीत टाकून तो मुकटी येथील घरी गेला आणि शांतपणे झोपला. दुसऱ्या दिवशी 4 ऑगस्ट मंगळवारी रोजी मृतदेहाची विल्हेवाट कुठे लावायची या विचारात तो दिवसभर कारमध्ये मृतदेह घेऊन फिरत होता. दुपारी त्याने लुटलेले सोने एका सोनाराकडे विकून रोख रक्कम मिळवली. त्यानंतर रात्रीच्या अंधारात बायपास हायवेवरील एका ड्रेनेज पट्टीच्या सिमेंटच्या गॅपमध्ये मृतदेह फेकून दिला.

घटनास्थळी सापडला मानवी सांगाडा

आरोपी प्रशांतने दिलेल्या माहितीच्या आधारे काल रविवारी रोजी जळगाव पोलिसांच्या पथकाने घटनास्थळी जाऊन शोध घेतला असता, तेथे अत्यंत कुजलेल्या अवस्थेत मानवी अवशेष आणि सांगाडा आढळून आला. पोलिसांनी सर्व अवशेष फॉरेन्सिक तपासासाठी ताब्यात घेतले आहेत.

प्रशांत पाटील

लेखकाबद्दलप्रशांत पाटीलप्रशांत पाटील ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन'(TIL) या आघाडीच्या डिजिटल माध्यम समूहात सीनियर डिजिटल कंन्टेट प्रोड्युसर पदावर कार्यरत आहेत. पुणे जिल्ह्यातील नामांकित ‘थोडक्यात’ न्यूज वेब पोर्टल, हैदराबादमधील ‘आधान शॉर्ट न्यूज अॅप’, ‘सकाळ मिडिया ग्रुप’ आणि आता ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’, असा जवळपास पाच ते साडेपाच वर्षांपेक्षा अधिक काळ ते कार्यरत आहेत. प्रशांत पाटील यांना महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील सर्व गुन्हेगारी, अपघात, शेतकरी विषयक बातम्या, ग्रामीण भागात यश संपादन केलेल्या तरुणी किंवा तरुणांच्या सक्सेस स्टोरीज् आणि महाराष्ट्र हायपर लोकल अशा विविध विषयांची आवड आहे. ऑगस्ट (2026) पासून ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन’साठी (TIL) काम करत आहेत. या दरम्यान, राज्यातील विधानसभा, लोकसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकींच्या बातम्यांवर विशेष लक्ष ठेवतात. याआधीही त्यांनी याच माध्यम समूहासोबत तीन वर्ष काम केलं आहे.

प्रशांत पाटील यांनी पुण्यातील नामांकित आबासाहेब गरवारे महाविद्यालयातून मास कम्युनिकेशन विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. शिक्षण घेत असतानाच त्यांनी ‘थोडक्यात’ या न्यूज वेब पोर्टलला काम केलं. तिथे डिजिटल माध्यमासाठी लेखन करत असताना त्यांना डिजिटल क्षेत्रातलं कसं काम करतात? हे यश संपादन केलं. त्यानंतर त्यांना मुंबईत ‘महाराष्ट्र टाइम्य ऑनलाईन’ (TIL) या नामांकित माध्यम समूहामध्ये काम करण्याची संधी मिळाली. 28 मार्च 2022 रोजी ते ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ या मोठ्या ब्रँण्डसोबत पहिल्यांदा जोडले गेले. तिथे त्यांनी प्रदीर्घ काळ म्हणजे तीन वर्ष डिजिटल विभागात काम केलं. त्यांनतर त्यांनी फेब्रुवारी 2025 ला ‘सकाळ मिडिया ग्रुप’ला काम करण्याची संधी मिळाली. परंतु तिथे ते काम करत असताना त्यांना पुन्हा ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ (TIL) या माध्यम समूहाने संधी दिली. त्यानंतर ऑगस्ट 2026 पासून प्रशांत पाटील हे ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’सोबत (TIL) काम करताय.

‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’मध्ये (TIL) काम करताना त्यांना खूप मोठमोठ्या संध्या मिळाल्या. जसे की, व्हिडिओ करणे, महाराष्ट्रातील संपूर्ण जिल्ह्यातील रिपोर्टर यांच्याशी समन्वय साधणे, जिल्हा प्रतिनिधींकडून वेळोवेळी काम करुन घेणे, विशेष आणि काही महत्वाच्या बातम्या मागवून घेणे, अशा बऱ्याच गोष्टींची त्यांना इथे मिळाली. प्रशांत पाटील हे सकाळच्या शिफ्टला काम करत असताना लाईव्ह ब्लॉग, रिपोर्टरशी बोलणे, ब्रेकिंग बातम्या, हायपर लोकल बातम्या, ग्रामीण भागातील सर्व घडामोडींकडे लक्ष देण्याचं काम ते करतात.… आणखी वाचा