• Tue. Sep 15th, 2026

FDA Ganeshotsav Rules: महाप्रसाद वाटा, स्वच्छतेचे निकष पाळा! गणेश मंडळांना ‘एफडीए’च्या मार्गदर्शक सूचना

FDA Ganeshotsav Rules: महाप्रसाद कॅटरर्सकडून तयार करून घेत असल्यास संबंधित कॅटरर्सकडे वैध अन्न परवाना किंवा नोंदणी असणे आवश्यक आहे.

(फोटोमहाराष्ट्र टाइम्स)
म. टा. प्रतिनिधी, नागपूर:गणेशोत्सवाला आजपासून सुरुवात होत असून, शहरातील विविध गणेश मंडळांकडून महाप्रसादाचे वाटप केले जाणार आहे. मंडळांनी महाप्रसाद तयार करण्यासाठी स्वतंत्र परवानगी घेण्याची गरज नसली, तरी स्वच्छता, सुरक्षितता आणि अन्नगुणवत्तेचे निकष काटेकोरपणे पाळणे अनिवार्य आहे, असे आवाहन अन्न व औषध प्रशासनाने केले आहे.

उत्सवकाळात मोठ्या प्रमाणात नागरिक महाप्रसाद, मिठाई, पेढे, बरफी, खवा, दूध व दुग्धजन्य पदार्थांचे सेवन करतात. अशावेळी अन्नपदार्थांच्या साठवणुकीत, हाताळणीत किंवा वितरणात निष्काळजीपणा झाल्यास विषबाधेचा धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे प्रसाद तयार करण्यापासून ते वाटपापर्यंत प्रत्येक टप्प्यावर स्वच्छतेची काळजी घेणे आवश्यक असल्याचे एफडीएने स्पष्ट केले आहे. गणेश मंडळांनी स्वतः महाप्रसाद तयार केल्यास स्वच्छतेचे नियम पाळणे बंधनकारक आहे.

Maharashtra TimesGaneshotsav 2026: यावे बाप्पा, स्वागत असो! श्रीगणेशाची आज जल्लोषात प्रतिष्ठापना; यंदा गणरायाचा बारा दिवस मुक्कामकच्चा मालही नोंदणीकृत अन्न व्यावसायिकांकडूनच खरेदी करावा, अशी सूचना देण्यात आली आहे. एफडीएचे अधिकारी तपासणीसाठी आल्यास मंडळांनी सहकार्य करावे. अन्नपदार्थांच्या गुणवत्तेबाबत काही तक्रार असल्यास नागरिकांनी टोल फ्री क्रमांक १८००२२२३६५ किंवा https: //complaints. mahafda. in या संकेतस्थळावर तक्रार नोंदवावी, असे आवाहन एफडीएचे सहआयुक्त कृष्णा जयपूरकर यांनी केले आहे.

Maharashtra TimesMaharashtra FDA: वर्षभर नव्हे, आता अहवाल 14 दिवसांत; शिफ्टमध्ये काम, एफडीएचा कारवायांचा धडाकाया सूचना लक्षात ठेवा

  • महाप्रसादासाठीचा कच्चा माल नोंदणीकृत अन्न व्यावसायिकांकडूनच खरेदी करावा.
  • स्वयंपाकाची जागा स्वच्छ, नीटनेटकी आणि आरोग्यदायी असावी.
  • प्रसादासाठी वापरण्यात येणारी भांडी स्वच्छ, झाकण असलेली आणि सुरक्षित असावीत.
  • कच्ची, सडलेली किंवा खराब फळे वापरू नयेत.
  • आवश्यक तेवढ्याच प्रमाणात प्रसाद तयार करावा.
  • प्रसादासाठी वापरले जाणारे पाणी पिण्यास योग्य असल्याची खात्री करावी.
  • स्वयंसेवकांनी अॅप्रॉन, ग्लोव्हज, टोपी आदी सुरक्षा साधने वापरावीत.
  • प्रसाद बनविणाऱ्या व्यक्तीस त्वचारोग किंवा संसर्गजन्य आजार नसावा.
  • खवा, मावा आणि दुग्धजन्य पदार्थ वापरताना विशेष काळजी घ्यावी.
  • दूध व दुग्धजन्य पदार्थांची साठवणूक ४ अंश सेल्सिअस किंवा त्यापेक्षा कमी तापमानात करावी.
  • एफडीए अधिकारी तपासणीसाठी आल्यास आवश्यक सहकार्य करावे.
किशोरी तेलकर

लेखकाबद्दलकिशोरी तेलकर किशोरी तेलकर

किशोरी तेलकर महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये कन्सल्टंट या पदावर कार्यरत आहेत. किशोरी या २०२२पासून मटा ऑनलाइन सोबत जोडलेल्या आहेत. राजकारण, हायपर लोकल स्टोरी, क्राईम बातम्या, महिलांविषयक समस्या, गाव खेड्यातल्या बातम्या करण्याचा त्यांचा अनुभव आहे.

पत्रकारितेतील अनुभव
किशोरी यांना वृत्तपत्र, टीव्ही आणि डिजिटल माध्यमांमधील ६ वर्षांचा अनुभव आहे. किशोरी यांनी सकाळ वृत्तपत्रातून पत्रकारितेला सुरुवात केली. सकाळ वृत्तपत्रात काम करतांना त्यांनी प्रिंट मीडियासोबतच सोशल मीडिया हॅंडलिंग, वेबसाईटचेही काम केलं आहे. सध्या चार वर्षांपासून त्या महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये कार्यरत आहेत. लेखन कौशल्याच्या जोरावर सामाजिक समस्या, शाळा- कॉलेज विद्यार्थी समस्या, आरोग्य टिप्स, महिलांविषयक प्रश्न, फॅशन, लाइफस्टाइल या विविध विषयांवर त्यांनी बातम्या केल्या आहेत.

शैक्षणिक पात्रता
किशोरी तेलकर यांनी कै. बिंदू रामराव देशमुख कला व वाणिज्य महिला महाविद्यालय, नाशिकरोड येथून एम.कॉम पदवी संपादन केली. त्यानंतर गोखले एज्युकेशन सोसायटीचे एच.पी.टी आर्ट्स अँड आर.वाय.के सायन्स कॉलेजमधून कम्युनिकेशन अँड जर्नलिझम विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. जर्नलिझमचे शिक्षण घेत असतानाच किशोरी यांनी देशदूत, दिव्यमराठी सारख्या वृत्तपत्रात इंटर्नशिप केलेली आहे. मराठी भाषेवर प्रभुत्व असून हिंदी, इंग्रजी भाषाही त्यांना अवगत आहेत.… आणखी वाचा