Navi Mumbai Crime News : राज्यात दिवसेंदिवस गुन्हेगारीचं प्रमाण वाढत चाललं आहे. अशातच नवी मुंबईत एक धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेत एका तरुणाची निर्घृण हत्या झाली आहे.
नवी मुंबई सनराईज हॉटेल अँड लॉजिंग बोर्डिंग हॉटेल तरुणाची हत्या(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
अमुलकुमार जैन, नवी मुंबई : नवी मुंबईतील शिरवणे गावात एका तरुणाची निर्घृण हत्या झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ‘सनराईज हॉटेल अँड लॉजिंग बोर्डिंग’च्या आवारात दोन तरुणांमध्ये झालेल्या जोरदार हाणामारीनंतर ही हत्या झाल्याची प्राथमिक माहिती आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.
नेमकी घटना काय?
मिळालेल्या माहितीनुसार, सनराईज हॉटेलजवळ दोन तरुणांमध्ये काही कारणावरून वादझाला. सुरुवातीला झालेल्या बाचाबाचीनंतर वादाचं रूपांतर हाणामारीत झालं. व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये एका तरुणाच्या हातात बांबूसदृश वस्तू तसेच धारदार हत्यारासारखी वस्तू दिसून येत असल्याचं सांगितलं जात आहे. काही वेळातच हा वाद अधिक चिघळला आणि त्यातून एका तरुणावर जीवघेणा हल्ला झाल्याची माहिती आहे.
Ganesh Festival: गणेशोत्सवानिमित्त लालबाग-परळमध्ये चैतन्य; भक्तांची वर्दळ वाढणार, मुंबई महापालिकेकडून खास उपाययोजना
संशयितांना ताब्यात घेतलं
या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या तरुणाचा मृत्यू झाल्याचं समोर आलं आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला. या प्रकरणात काही संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतलं असून त्यांची चौकशी सुरू असल्याची माहिती मिळाली आहे.
व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल
दरम्यान, हाणामारीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानं या घटनेची चर्चा परिसरात मोठ्या प्रमाणात सुरू आहे. हत्या नेमक्या कोणत्या कारणातून झाली, हल्ल्यात किती जण सहभागी होते आणि व्हायरल व्हिडिओतील व्यक्तींची या घटनेशी नेमकी काय भूमिका आहे, याचा तपास पोलीस करत आहेत. स्थानिक पोलिसांशी संपर्क साधला असता, अधिकृत प्रतिक्रिया देण्यास त्यांनी नकार दिला. त्यामुळे मृत तरुणाची ओळख, हत्येचं नेमकं कारण आणि आरोपींची संख्या याबाबत अधिकृत माहिती अद्याप स्पष्ट झालेली नाही. पुढील तपासानंतर या प्रकरणातील अधिक तपशील समोर येण्याची शक्यता आहे.
Maharashtra Rain Update : आधी पाऊसतडाखा, नंतर इशारा! बेसावध नागरिकांचे हाल, आज मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता; हवामान विभागाचा अंदाज
नवी मुंबईतील नवविवाहितेचा करुण अंत
काही दिवसांपूर्वी प्रेमविवाहानंतर अवघ्या चार दिवसांत पतीने नवविवाहित पत्नीला केलेल्या कथित जीवघेण्या मारहाणीत महिलेचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. नवी मुंबईतील घणसोली परिसरात हा अंगावर काटा आणणारा प्रकार घडला. सायली लोखंडे असं मृत नवविवाहितेचं नाव आहे. या प्रकरणी रबाळे पोलिसांनी पती सागर कदम याला अटक केली आहे. सागरने केलेल्या मारहाणीत गंभीर जखमी झालेल्या सायलीने उपचारादरम्यान रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला.
लेखकाबद्दलप्रशांत पाटीलप्रशांत पाटील ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन'(TIL) या आघाडीच्या डिजिटल माध्यम समूहात सीनियर डिजिटल कंन्टेट प्रोड्युसर पदावर कार्यरत आहेत. पुणे जिल्ह्यातील नामांकित ‘थोडक्यात’ न्यूज वेब पोर्टल, हैदराबादमधील ‘आधान शॉर्ट न्यूज अॅप’, ‘सकाळ मिडिया ग्रुप’ आणि आता ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’, असा जवळपास पाच ते साडेपाच वर्षांपेक्षा अधिक काळ ते कार्यरत आहेत. प्रशांत पाटील यांना महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील सर्व गुन्हेगारी, अपघात, शेतकरी विषयक बातम्या, ग्रामीण भागात यश संपादन केलेल्या तरुणी किंवा तरुणांच्या सक्सेस स्टोरीज् आणि महाराष्ट्र हायपर लोकल अशा विविध विषयांची आवड आहे. ऑगस्ट (2026) पासून ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन’साठी (TIL) काम करत आहेत. या दरम्यान, राज्यातील विधानसभा, लोकसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकींच्या बातम्यांवर विशेष लक्ष ठेवतात. याआधीही त्यांनी याच माध्यम समूहासोबत तीन वर्ष काम केलं आहे.
प्रशांत पाटील यांनी पुण्यातील नामांकित आबासाहेब गरवारे महाविद्यालयातून मास कम्युनिकेशन विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. शिक्षण घेत असतानाच त्यांनी ‘थोडक्यात’ या न्यूज वेब पोर्टलला काम केलं. तिथे डिजिटल माध्यमासाठी लेखन करत असताना त्यांना डिजिटल क्षेत्रातलं कसं काम करतात? हे यश संपादन केलं. त्यानंतर त्यांना मुंबईत ‘महाराष्ट्र टाइम्य ऑनलाईन’ (TIL) या नामांकित माध्यम समूहामध्ये काम करण्याची संधी मिळाली. 28 मार्च 2022 रोजी ते ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ या मोठ्या ब्रँण्डसोबत पहिल्यांदा जोडले गेले. तिथे त्यांनी प्रदीर्घ काळ म्हणजे तीन वर्ष डिजिटल विभागात काम केलं. त्यांनतर त्यांनी फेब्रुवारी 2025 ला ‘सकाळ मिडिया ग्रुप’ला काम करण्याची संधी मिळाली. परंतु तिथे ते काम करत असताना त्यांना पुन्हा ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ (TIL) या माध्यम समूहाने संधी दिली. त्यानंतर ऑगस्ट 2026 पासून प्रशांत पाटील हे ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’सोबत (TIL) काम करताय.
‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’मध्ये (TIL) काम करताना त्यांना खूप मोठमोठ्या संध्या मिळाल्या. जसे की, व्हिडिओ करणे, महाराष्ट्रातील संपूर्ण जिल्ह्यातील रिपोर्टर यांच्याशी समन्वय साधणे, जिल्हा प्रतिनिधींकडून वेळोवेळी काम करुन घेणे, विशेष आणि काही महत्वाच्या बातम्या मागवून घेणे, अशा बऱ्याच गोष्टींची त्यांना इथे मिळाली. प्रशांत पाटील हे सकाळच्या शिफ्टला काम करत असताना लाईव्ह ब्लॉग, रिपोर्टरशी बोलणे, ब्रेकिंग बातम्या, हायपर लोकल बातम्या, ग्रामीण भागातील सर्व घडामोडींकडे लक्ष देण्याचं काम ते करतात.… आणखी वाचा