Chief Minister Devendra Fadnavis on Manoj Jarange : मराठा आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा आजचा 18 वा दिवस आहे. मनोज जरांगे आज (15 सप्टेंबर) सकाळी 11 वाजता मोजक्या समर्थकांसह अंतरवाली सराटीतून मुंबईच्या दिशेने रवाना होणार आहेत.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ऑन मनोज जरांगे पाटील मराठा आरक्षण(फोटो– महाराष्ट्र टाइम्स)
म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई : ‘मराठा आंदोलकांच्या जवळपास सर्वच मागण्या राज्य सरकारने पूर्ण केल्या आहेत. काही मागण्या न्यायालयाच्या निर्णयाधीन आहेत. न्यायालय किंवा इतर संवैधानिक पद्धतींचा अवलंब करूनच त्या आपण पूर्ण करू शकतो. त्यामुळे सध्या गणेशपर्व सुरू असताना मुंबईत आंदोलन करून गणेशभक्तांना असुविधा होईल असे वागणे कोणासाठीच योग्य नाही. त्यामुळे मुंबईतील आंदोलनाचा पुनर्विचार व्हावा,’ असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे. ‘समान नागरी कायद्याच्या अंमलबजावणी संदर्भात राज्य सरकारने याआधीच समिती स्थापन केली आहे. या समितीच्या अहवालानंतर याबाबतचा निर्णय घेऊ,’ असेही ते म्हणाले.
…त्या मान्य करू शकत नाही
मुख्यमंत्री फडणवीस यांच्या वर्षा या निवासस्थानी गणेशाची प्राणप्रतिष्ठा झाली. त्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. ‘जरांगे यांच्या ज्या मागण्या राज्यघटनेला अनुसरून आहेत त्या करायला तयार आहोत; पण ज्या मागण्या कायदा, न्यायालयीन नियम यांच्या बाहेरच्या असतील त्या मान्य करू शकत नाही. आम्ही चर्चेची दारे बंदही केलेली नाहीत,’ असेही मुख्यमंत्री म्हणाले.
‘ब्रिक्स’ परिषदेत केवळ शाकाहारी जेवण ठेवल्याबद्दल लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी टीका केली होती. त्याबाबत विचारले असता, ‘छोट्या मनाचे लोक किंवा अनेक वेळा बुद्धी संकुचित झाली, की अशा प्रकारे वागतात. ब्रिक्स ही केवळ जेवणासाठी नव्हती. या परिषदेची सर्वांत मोठी यशस्विता म्हणजे, सगळ्या देशांनी इतक्या संवेदनशील परिस्थितीत दिल्ली जाहीरनामा मान्य केला, असेही मुख्यमंत्री म्हणाले.
जरांगे एकटेच मुंबईला जाणार
मुंबईत आपण एकटे जाणार असल्याचे मनोज जरांगे-पाटील यांनी सोमवारी (१४ सप्टेंबर) अंतरवाली सराटी येथे सांगितले. ‘आपल्यासोबत कोणत्याही मराठा आंदोलकांनी येऊ नये. आपण सांगू त्या वेळी सगळे मुंबईत या,’ असेही ते या वेळी म्हणाले. ‘पोलिसांनी आझाद मैदानावर जमावाने आंदोलन करण्यास परवानगी नाकारली आहे. त्यामुळे आता आपण एकटेच येतो. सोबत चार जण असतील. आता परवानगी नाकारण्याचे कारण नाही,’ असेही त्यांनी सांगितले. ‘आपल्यासोबत दोन रुग्णवाहिका आणि दोन गाड्या असतील. मुंबईत जाण्याचा मार्ग पूर्वीचाच असेल. गुरुवारी (१९ सप्टेंबर) मुंबईत पोहोचून आमरण उपोषण सुरू केलेले असेल,’ असेही ते म्हणाले. शनिवारी रात्रीपासून जरांगे यांनी सलाइन लावून घेणे बंद केले आहे. त्यामुळे त्यांची प्रकृती ढासळत आहे. आज, मंगळवारी सकाळी अकराच्या सुमारास जरांगे मुंबईला निघणार आहेत.
लेखकाबद्दलप्रशांत पाटीलप्रशांत पाटील ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन'(TIL) या आघाडीच्या डिजिटल माध्यम समूहात सीनियर डिजिटल कंन्टेट प्रोड्युसर पदावर कार्यरत आहेत. पुणे जिल्ह्यातील नामांकित ‘थोडक्यात’ न्यूज वेब पोर्टल, हैदराबादमधील ‘आधान शॉर्ट न्यूज अॅप’, ‘सकाळ मिडिया ग्रुप’ आणि आता ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’, असा जवळपास पाच ते साडेपाच वर्षांपेक्षा अधिक काळ ते कार्यरत आहेत. प्रशांत पाटील यांना महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील सर्व गुन्हेगारी, अपघात, शेतकरी विषयक बातम्या, ग्रामीण भागात यश संपादन केलेल्या तरुणी किंवा तरुणांच्या सक्सेस स्टोरीज् आणि महाराष्ट्र हायपर लोकल अशा विविध विषयांची आवड आहे. ऑगस्ट (2026) पासून ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन’साठी (TIL) काम करत आहेत. या दरम्यान, राज्यातील विधानसभा, लोकसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकींच्या बातम्यांवर विशेष लक्ष ठेवतात. याआधीही त्यांनी याच माध्यम समूहासोबत तीन वर्ष काम केलं आहे.
प्रशांत पाटील यांनी पुण्यातील नामांकित आबासाहेब गरवारे महाविद्यालयातून मास कम्युनिकेशन विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. शिक्षण घेत असतानाच त्यांनी ‘थोडक्यात’ या न्यूज वेब पोर्टलला काम केलं. तिथे डिजिटल माध्यमासाठी लेखन करत असताना त्यांना डिजिटल क्षेत्रातलं कसं काम करतात? हे यश संपादन केलं. त्यानंतर त्यांना मुंबईत ‘महाराष्ट्र टाइम्य ऑनलाईन’ (TIL) या नामांकित माध्यम समूहामध्ये काम करण्याची संधी मिळाली. 28 मार्च 2022 रोजी ते ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ या मोठ्या ब्रँण्डसोबत पहिल्यांदा जोडले गेले. तिथे त्यांनी प्रदीर्घ काळ म्हणजे तीन वर्ष डिजिटल विभागात काम केलं. त्यांनतर त्यांनी फेब्रुवारी 2025 ला ‘सकाळ मिडिया ग्रुप’ला काम करण्याची संधी मिळाली. परंतु तिथे ते काम करत असताना त्यांना पुन्हा ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ (TIL) या माध्यम समूहाने संधी दिली. त्यानंतर ऑगस्ट 2026 पासून प्रशांत पाटील हे ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’सोबत (TIL) काम करताय.
‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’मध्ये (TIL) काम करताना त्यांना खूप मोठमोठ्या संध्या मिळाल्या. जसे की, व्हिडिओ करणे, महाराष्ट्रातील संपूर्ण जिल्ह्यातील रिपोर्टर यांच्याशी समन्वय साधणे, जिल्हा प्रतिनिधींकडून वेळोवेळी काम करुन घेणे, विशेष आणि काही महत्वाच्या बातम्या मागवून घेणे, अशा बऱ्याच गोष्टींची त्यांना इथे मिळाली. प्रशांत पाटील हे सकाळच्या शिफ्टला काम करत असताना लाईव्ह ब्लॉग, रिपोर्टरशी बोलणे, ब्रेकिंग बातम्या, हायपर लोकल बातम्या, ग्रामीण भागातील सर्व घडामोडींकडे लक्ष देण्याचं काम ते करतात.… आणखी वाचा