• Fri. Sep 18th, 2026

Maharashtra Live News 15th September 2026 : मराठा आंदोलकांच्या मागण्या मान्य, गणेशोत्सवात असुविधा नको; मुख्यमंत्र्यांचे आवाहन

सणासुदीत महागाईचा भडका, घाऊक महागाई दर पोहोचला ९.९२ टक्क्यांवर

ऐन सणासुदीत महागाईचा आणखी भडका उडाला आहे. केंद्र सरकारने सोमवारी जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, घाऊक किंमत निर्देशांकावर (डब्ल्यूपीआय) आधारित महागाईचा दर ऑगस्ट २०२६ मध्ये ९.९२ टक्क्यांवर पोहोचला. जुलैमध्ये घाऊक महागाई दर ९.७८ टक्के होता. खाद्यपदार्थांच्या किमतीही ऑगस्टमध्ये वाढून ही महागाई महिनाभरात ६.६५ टक्क्यांवरून ७.०५ टक्क्यांवर वाढली. वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयानुसार ऑगस्टमध्ये सर्व वस्तूंचा घाऊक किंमत निर्देशांक ११०.८ राहिला. जुलैमध्ये तो ११०.० होता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed