• Tue. Sep 15th, 2026

Maharashtra Rain Update : आधी पाऊसतडाखा, नंतर इशारा! बेसावध नागरिकांचे हाल, आज मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता; हवामान विभागाचा अंदाज

Maharashtra Rain News : जिल्ह्यात अनेक दिवसांच्या खंडानंतर पावसाने पुन्हा हजेरी लावली आहे. रविवारी सकाळी साडेआठपर्यंतच्या २४ तासांत जिल्ह्यात सरासरी ११.२ मिलीमीटर पावसाची नोंद झाली. जिल्ह्याच्या घाटमाथ्यावर सोमवारी पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला असून, मध्यम स्वरूपाच्या सरी कोसळण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

मुंबई हवामान बातम्या(फोटोमहाराष्ट्र टाइम्स)
म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई : महामुंबई परिसरात तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता भारतीय हवामान विभागाने वर्तवली असताना प्रत्यक्षात शनिवार रात्रीपासूनच पावसाचा जोर वाढला. हवामान विभागाने पावसाचा जोर वाढल्यानंतर रविवारी दुपारी १२.३० च्या सुमारास महामुंबई परिसराला ऑरेंज ॲलर्ट दिला. मात्र, त्याआधीच सखल भागांत पाणी साचल्याने नागरिकांची त्रेधातिरपीट उडाल्याने हवामान विभागाविरोधात नाराजीचा सूर उमटला.

कुठे किती पावसाची नोंद?

मुंबईमध्येरविवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये सांताक्रूझ येथे ७८.७ तर, कुलाबा येथे ४०.८ मिलीमीटर पावसाची नोंद झाली. डहाणू येथे ४५.२ मिलीमीटर पाऊस नोंदला गेला. शनिवारी रात्रीपासून सकाळी १०पर्यंत पूर्व आणि पश्चिम उपनगरांमध्ये पावसाचा जोर अधिक होता. मुंबई महापालिकेच्या आकडेवारीनुसार वांद्रे कुर्ला संकुल अग्निशमन दल केंद्र येथे १४७.६ मिलीमीटर, बोरिवली अग्निशमन दल केंद्र येथे १३८ मिलीमीटर, आर मध्य महापालिका कार्यालय येथे १३५ मिलीमीटर, एम पश्चिम महापालिका कार्यालय येथे १३५.६ मिलीमीटर, चेंबूर येथील कलेक्टर कॉलनी येथे १३२.८ मिलीमीटर, गोवंडी येथील शिवाजीनगर महापालिका शाळा येथे १२१.८ मिलीमीटर पावसाची नोंद झाली. शहरामध्ये एफ दक्षिण विभाग येथे १०६.२, जी उत्तर येथे १०३.८ मिलीमीटर पाऊस नोंदला गेला.

Maharashtra TimesFDA Ganeshotsav Rules: महाप्रसाद वाटा, स्वच्छतेचे निकष पाळा! गणेश मंडळांना ‘एफडीए’च्या मार्गदर्शक सूचना

प्रादेशिक हवामान विभागाकडून काय सांगण्यात आलं?

सकाळी १० पर्यंत पावसाचा तडाखा बसून, सखल भागांमध्ये पाणी साचल्यानंतर दुपारी १२.३० च्या सुमारास प्रादेशिक हवामान विभागाने मुंबई तसेच ठाणे, पालघर येथे ऑरेंज ॲलर्ट जारी केला. हा इशारा सोमवार सकाळी ८.३० पर्यंत कायम असल्याचे प्रादेशिक हवामान विभागाकडून सांगण्यात आले. मुंबईमध्ये सकाळी ८.३० ते सायं. ५.३० या कालावधीत कुलाब्यात ३० मिलीमीटर तर सांताक्रूझ येथे ७९.७ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे.

वातावरणात भक्तिरंगाची उधळण

लाडक्या गणरायाच्या स्वागतासाठी घरोघरी तयारीची लगबग सुरू असतानाच रविवारी मुंबई, महामुंबई परिसरातील आकाशात कृष्णमेघांनी गर्दी केली आणि विघ्नहर्त्याच्या स्वागतासाठी निसर्गानेच जणू मंगलाभिषेक सुरू केला. गणरायाच्या आगमनाला अवघे २४ तास उरले असताना बरसलेल्या या सुखसरींनी वातावरणात भक्तिरंगाची उधळण केल्याने गेल्या काही दिवसांपासून दाटलेली पाऊसचिंता थोड्या प्रमाणात का होईना दूर तर झालीच शिवाय गणरायाच्या स्वागताचा उत्साहसुद्धा द्विगुणित झाला.

Maharashtra TimesGaneshotsav 2026: यावे बाप्पा, स्वागत असो! श्रीगणेशाची आज जल्लोषात प्रतिष्ठापना; यंदा गणरायाचा बारा दिवस मुक्काम

पावसाने दिवसभर उसंत घेतली नाही

गणेशोत्सवाच्या आगमनासाठी अवघी मुंबई सज्ज होत असताना रविवारी पावसाने शहराला झोडपून काढले. पावसाने दिवसभर उसंत घेतली नाही. मात्र, त्याचा भक्तांच्या खरेदी उत्साहावर तसूभरही परिणाम जाणवला नाही. छत्र्या आणि रेनकोटच्या आडून मुंबईकरांनी बाजारपेठ गाठत गणेशोत्सवासाठीची शेवटच्या टप्प्यातील खरेदी उरकली. गणेशोत्सवाच्या आदल्या दिवशी बाजारपेठांमध्ये सकाळपासूनच खरेदीची लगबग दिसून आली. घरातील गणरायाच्या स्वागतासाठी लागणारे पूजेचे साहित्य, सजावटीच्या वस्तू, फुले, तोरणे, विद्युत रोषणाई, आरास करण्यासाठीच्या वस्तू यांची खरेदी करण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली होती.

पूजेचे साहित्य सुरक्षित ठेवण्यासाठीही विशेष काळजी

‘पाऊस कितीही असला तरी गणेशोत्सवाची तयारी थांबवता येत नाही. यंदा घरची आरास थोडी वेगळी करायची आहे, त्यामुळे शेवटच्या क्षणापर्यंत खरेदी सुरू आहे’, असे स्वप्नील पिकुळकर यांनी सांगितले. काही ठिकाणी दुकानदारांनी साहित्य भिजू नये म्हणून दुकानांसमोर प्लास्टिकचे आच्छादन केले होते. सजावटीच्या वस्तू आणि पूजेचे साहित्य सुरक्षित ठेवण्यासाठीही विशेष काळजी घेतली जात होती.

Maharashtra TimesCrime News : व्यावसायिकाला आंतरराष्ट्रीय कॉलमधून धमकी, मुंबईच्या गुन्हे शाखेने एकाला उचललं, पोलिसांना पाकिस्तान कनेक्शनचा संशय

विविध आकर्षक पर्याय उपलब्ध

गणेशोत्सवासाठी घराची सजावट करण्यासाठी यंदा पारंपरिक वस्तूंसोबत विविध आकर्षक पर्याय उपलब्ध आहेत. त्यामुळे शेवटच्या क्षणी खरेदी करणाऱ्यांनाही आपल्या पसंतीनुसार साहित्य निवडता येत आहे. फुलांची सजावट, आरास, तोरणे आणि रोषणाईच्या वस्तूंना ग्राहकांची पसंती असल्याचे विक्रेत्यांनी सांगितले. ‘पावसामुळे खरेदीवर परिणाम होईल असे वाटत होते. मात्र, सकाळपासून ग्राहक येत आहेत. विशेषतः पूजेचे साहित्य आणि सजावटीच्या वस्तू घेण्यासाठी शेवटच्या क्षणी येणाऱ्यांची संख्या मोठी आहे,’ असे संदीप शिंदे या अंधेरीतील विक्रेत्याने सांगितले.

प्रशांत पाटील

लेखकाबद्दलप्रशांत पाटीलप्रशांत पाटील ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन'(TIL) या आघाडीच्या डिजिटल माध्यम समूहात सीनियर डिजिटल कंन्टेट प्रोड्युसर पदावर कार्यरत आहेत. पुणे जिल्ह्यातील नामांकित ‘थोडक्यात’ न्यूज वेब पोर्टल, हैदराबादमधील ‘आधान शॉर्ट न्यूज अॅप’, ‘सकाळ मिडिया ग्रुप’ आणि आता ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’, असा जवळपास पाच ते साडेपाच वर्षांपेक्षा अधिक काळ ते कार्यरत आहेत. प्रशांत पाटील यांना महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील सर्व गुन्हेगारी, अपघात, शेतकरी विषयक बातम्या, ग्रामीण भागात यश संपादन केलेल्या तरुणी किंवा तरुणांच्या सक्सेस स्टोरीज् आणि महाराष्ट्र हायपर लोकल अशा विविध विषयांची आवड आहे. ऑगस्ट (2026) पासून ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन’साठी (TIL) काम करत आहेत. या दरम्यान, राज्यातील विधानसभा, लोकसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकींच्या बातम्यांवर विशेष लक्ष ठेवतात. याआधीही त्यांनी याच माध्यम समूहासोबत तीन वर्ष काम केलं आहे.

प्रशांत पाटील यांनी पुण्यातील नामांकित आबासाहेब गरवारे महाविद्यालयातून मास कम्युनिकेशन विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. शिक्षण घेत असतानाच त्यांनी ‘थोडक्यात’ या न्यूज वेब पोर्टलला काम केलं. तिथे डिजिटल माध्यमासाठी लेखन करत असताना त्यांना डिजिटल क्षेत्रातलं कसं काम करतात? हे यश संपादन केलं. त्यानंतर त्यांना मुंबईत ‘महाराष्ट्र टाइम्य ऑनलाईन’ (TIL) या नामांकित माध्यम समूहामध्ये काम करण्याची संधी मिळाली. 28 मार्च 2022 रोजी ते ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ या मोठ्या ब्रँण्डसोबत पहिल्यांदा जोडले गेले. तिथे त्यांनी प्रदीर्घ काळ म्हणजे तीन वर्ष डिजिटल विभागात काम केलं. त्यांनतर त्यांनी फेब्रुवारी 2025 ला ‘सकाळ मिडिया ग्रुप’ला काम करण्याची संधी मिळाली. परंतु तिथे ते काम करत असताना त्यांना पुन्हा ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ (TIL) या माध्यम समूहाने संधी दिली. त्यानंतर ऑगस्ट 2026 पासून प्रशांत पाटील हे ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’सोबत (TIL) काम करताय.

‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’मध्ये (TIL) काम करताना त्यांना खूप मोठमोठ्या संध्या मिळाल्या. जसे की, व्हिडिओ करणे, महाराष्ट्रातील संपूर्ण जिल्ह्यातील रिपोर्टर यांच्याशी समन्वय साधणे, जिल्हा प्रतिनिधींकडून वेळोवेळी काम करुन घेणे, विशेष आणि काही महत्वाच्या बातम्या मागवून घेणे, अशा बऱ्याच गोष्टींची त्यांना इथे मिळाली. प्रशांत पाटील हे सकाळच्या शिफ्टला काम करत असताना लाईव्ह ब्लॉग, रिपोर्टरशी बोलणे, ब्रेकिंग बातम्या, हायपर लोकल बातम्या, ग्रामीण भागातील सर्व घडामोडींकडे लक्ष देण्याचं काम ते करतात.… आणखी वाचा