म. टा. प्रतिनिधी, मुंबई: मुंबईतील गणेशोत्सवात सर्वाधिक आकर्षणबिंदू म्हणजे लालबाग-परळचा परिसर. आजपासून सुरू होत असलेल्या गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर लालबाग-परळ, हिंदमाताचा परिसर सज्ज झाला आहे. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या गणेशदर्शनासाठी आजपासून या भागांत गणेशभक्तांची वर्दळ वाढणार असल्याने मुंबई महापालिकेनेही विविध उपाययोजना केल्या आहेत.
‘गणपती बाप्पा मोरया’चा जयघोष करत आज, सोमवारपासून मुंबईत ठिकठिकाणी मोठ्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांसह घरगुती गणरायांचे आगमन होईल. या पार्श्वभूमीवर लालबाग-परळ, हिंदमाता परिसरात उत्सवी वातावरण असल्याचे चित्र रविवारी होते. आज, सोमवारपासून गणेशभक्तांची पावले या भागांकडे वळणार असल्याने महापालिकेनेही सज्जता ठेवली आहे.
मोठ्या संख्येने येणाऱ्या गणेशभक्तांमुळे या परिसरात जागोजागी कचरा, अस्वच्छता पसरू नये, यासाठी एफ दक्षिण वॉर्डकडून सफाई कर्मचाऱ्यांची फौज सज्ज असणार आहे. शिवाय, स्वयंसेवी संस्थांचीही मदत घेण्यात येणार आहे. महापालिकेच्या ५० सफाई कामागारांच्या जोडीला स्वयंसेवी संस्थांचे ६० कर्मचारीही मदतीला असणार आहेत. या परिसरात अनेकदा या काळात पिण्याच्या पाण्याच्या प्लास्टिक बाटल्यांचा खच रस्त्यावर पडतो. या बाटल्या डब्यातच टाकण्यासाठी प्रथमच सात ठिकाणी बास्केट डबे बसवण्यात आले आहेत.
गणेशोत्सवात लालबाग, परळ भागांत लाखो भाविकांची गर्दी ओसंडून वाहत असते. लालबागचा राजा, गणेशगल्ली, चिंतामणी, तेजुकाया, परळचा राजा, रंगारी बदक चाळ आदी मंडळांच्या गणपतींचे दर्शन घेण्यासाठी मुंबईसह विविध भागांतून येणाऱ्या गणेशभक्तांची संख्या जास्त असते. दर्शनासाठी येणाऱ्या अतिमहत्त्वाच्या व्यक्तींचाही यात समावेश असतो. येथे येणाऱ्या भक्तांच्या गर्दीचे नियोजन आणि सुरक्षित दर्शनासाठी कार्यकर्त्यांची फौजही असते. त्यासोबतच आता महापालिकेनेही जय्यत तयारी केली आहे.
या भागात पुढील दहा दिवसांत मोठ्या प्रमाणात घनकचरा होतो. त्यामुळे प्रत्येक दिवशी स्वच्छता राहावी, यासाठी कचरा वाहून नेण्यावर अधिक भर घनकचरा व्यवस्थापन विभागाकडून दिला जातो. यंदा महापालिकेच्या एफ दक्षिण वॉर्डकडूनही सज्जता ठेवण्यात आली असून महापालिकेचे ५० सफाई कामगार, सहा मुकादम, स्वयंसेवी संस्थांचे ६० सफाई कामगार, कचरा वाहून नेणारे सहा मिनी कॉम्पेक्टर, चार मोठे कॉम्पेक्टर तयार ठेवण्यात आले आहेत. यंदा १२० लिटर क्षमतेचे मोठे ३० कचऱ्याचे डबेही ठिकठिकाणी बसवले आहेत. गेल्या वर्षी कमी क्षमतेचे डबे बसवण्यात आले होते. यावेळी प्रथमच एफ दक्षिण वॉर्डमध्ये प्लास्टिक बाटल्या गोळा केल्या जातील, असे बास्केट डबे बसवण्यात आल्याची माहिती एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.
लेखकाबद्दलअक्षय शितोळेअक्षय शितोळे हे २०१८ पासून डिजिटल मीडियात कार्यरत असून सध्या मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. राज्यभरातील रिपोर्टर्ससोबत समन्वय साधत महाराष्ट्रातील गावगाड्यापासून मोठ्या शहरांमधील दैनंदिन घडामोडी मटा ऑनलाइनसाठी वेगवान आणि अचूक पद्धतीने मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. राजकीय बातम्यांमध्ये विशेष रस, बातम्यांमागची बातमी अर्थात घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेण्याचा सातत्याने प्रयत्न असतो. शेती आणि ग्रामीण जीवन हे जिव्हाळ्याचे विषय आहेत.
पत्रकारितेतील अनुभव
अक्षय शितोळे यांनी २०१८ मध्ये आपल्या पत्रकारितेतील प्रवासाचा प्रारंभ केला. सुरुवातीला न्यूज १८ लोकमत या वेबसाईटसाठी काम करताना ट्रेनी, सब एडिटर असा त्यांचा प्रवास राहिला. या कार्यकाळात प्रामुख्याने राजकीय बातम्यांसह स्थानिक पातळीवरील विविध घडामोडी कव्हर करण्याचे काम त्यांनी केले. २०१९ च्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध राजकीय घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेतला. पुढे २०२१ मटा ऑनलाइनमध्ये डिजिटल कंटेट प्रोड्युसर म्हणून जॉइन झाले. यावेळी राजकीय बातम्यांसह विविध जिल्ह्यांतील प्रतिनिधींशी समन्वय ठेवत वेबसाईटसाठी वेगवान आणि अचूक बातम्या मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न राहिला. तसंच मटा ऑनलाइनला २५ वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी महाराष्ट्राच्या दोन दशकांच्या सामाजिक वाटचालीचा आढावा घेणारा विशेष लेख लिहिला होता. “आरक्षणाचे लढे आणि तिढे, टोकदार जातीय अस्मिता ; २५ वर्षांत कसं ढवळून निघालं महाराष्ट्राचं समाजमन?” शीर्षकाखाली लिहिलेल्या या लेखाच्या माध्यमातून महाराष्ट्रात मागील २५ वर्षांत जी सामाजिक स्थित्यंतरे झाली, ज्या घटनांनी महाराष्ट्राच्या सामाजिक रचनेवर परिणाम केला, अशा घडामोडींचा सविस्तर आढावा घेतला होता. २०२३ मध्ये त्यांनी लोकमत ऑनलाइनसोबतही काम केले असून ते २०२५ पासून पुन्हा मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिलट कंटेंट प्रोड्युसर म्हणून रुजू झाले. विविध जिल्ह्यांतील रिपोर्टर्ससोबत संवाद साधत स्थानिक घडामोडींसह राज्यभरात महत्त्वाच्या बातम्या कव्हर करण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. तसंच विश्लेषणात्मक व्हिडिओच्या माध्यमातून राजकीय घटनांचे अन्वयार्थ प्रेक्षकांसमोर उलगडण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. महाराष्ट्रात २०२५-२६ साली झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध विश्लेषणात्मक व्हिडिओंच्या माध्यमातून राजकीय घडामोडींचं सोप्या शब्दांत विश्लेषण केले. तसंच महानगरपालिका निवडणूक निकालानंतर राजकीय विश्लेषकांची मुलाखत घेत या निवडणूक निकालाचा वेध घेण्याचा प्रयत्न केला.
मुलाखतीची लिंक: Uddhav Thackeray यांचा BMC मध्ये का झाला पराभव? सविस्तर विश्लेषण – https://youtu.be/8UeV9w1vwxQ?si=2sMWoovyx07EpjVU
शैक्षणिक पात्रता
अक्षय शितोळे यांनी १२ वी पर्यंतचे शिक्षण आपल्या मूळ गावी घेतले असून नंतर त्यांनी मुंबई येथील नामांकित असलेल्या रुईया महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवी (Bachelor of mass media) चे शिक्षण पूर्ण केले.… आणखी वाचा