• Mon. Sep 14th, 2026

लक्ष्मण हाकेंची वायप्लस सुरक्षा काढा, मराठा समाज आक्रमक, महेश डोंगरेंचा मुख्यमंत्र्यांना इशारा

ByMH LIVE NEWS

Sep 14, 2026 #mt

महाराष्ट्र टाइम्स.कॉम

आरक्षणाच्या लढाईमुळे मराठा विरुद्ध ओबीसी समाजातील संघर्ष वाढताना दिसतो. तर दुसरीकडे मराठा नेते मनोज जरांगे पाटील विरुद्ध ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्यात देखील वारंवार शाब्दिक चकमक रंगते. अशातच आता लक्ष्मण हाके यांच्या सुरक्षेवरून मराठा समाज आक्रमक होत असल्याचं पाहायला मिळतंय. हाके यांना कशासाठी संरक्षण दिले आहे. तात्काळ वायप्लस पोलीस सुरक्षा काढण्यात यावी अन्यथा मराठा समाज आंदोलन उभं करणार, असा इशारा मराठा क्रांती मोर्चाचे राज्य समन्वयक महेश डोंगरे पाटील यांनी दिला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed