• Mon. Sep 14th, 2026

Mumbai Local News : नेरुळ-सीवूड्स येथील एका शाळेत बारावीमध्ये शिकणारी ही विद्यार्थिनी ११ सप्टेंबरला गाडी क्रमांक ९८११९ एसी लोकलने सीवूड्सहून मानसरोवरच्या दिशेने प्रवास करत होती. तिच्याकडे प्रथम श्रेणीचे वैध तिकीट होते.

मुंबई एसी लोकल तिकीट विद्यार्थिनीला फिरवलं(फोटोमहाराष्ट्र टाइम्स)
महेश चेमटे, मुंबई : वातानुकूलित लोकलच्या तिकीटावरून झालेल्या वादानंतर एका अल्पवयीन ( १७ वर्षे ) मुलीला मध्य रेल्वेच्या तिकीट तपासनीसांनी विविध स्थानकांत फिरवल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या विद्यार्थिनीला फिरवून अखेर वडाळा स्थानकात सोडल्याचा आरोप तिच्या पालकांनी मध्य रेल्वेकडे केलेल्या तक्रारीत आहे. दरम्यान, या मुलीला मुद्दाम बेवारसपणे सोडल्याचा आरोप सिद्ध झालेला नाही, असे मध्य रेल्वेने स्पष्ट केले आहे.

पालकांनी तक्रारीत काय नमूद केलं?

नेरुळ-सीवूड्स येथील एका शाळेत बारावीमध्ये शिकणारी ही विद्यार्थिनी ११ सप्टेंबरला गाडी क्रमांक ९८११९ एसी लोकलने सीवूड्सहून मानसरोवरच्या दिशेने प्रवास करत होती. तिच्याकडे प्रथम श्रेणीचे वैध तिकीट होते. मात्र, एसी लोकलमधून प्रवास करण्यासाठी एसी लोकलचे तिकीट आवश्यक असते, हे तिला माहिती नव्हते. ही विद्यार्थिनी शाळेच्या गणवेशात असल्याने तिचे वयही सहज लक्षात येण्यासारखे होते, असे पालकांनी तक्रारीत नमूद केले आहे.

Maharashtra TimesPune News : पुण्यात बाप्पाच्या आगमनासाठी वाहतुकीत महत्त्वाचे बदल, पर्यायी मार्ग वापरण्याचे वाहतूक पोलिसांचं आवाहन; कसा असेल मार्ग?

विद्यार्थिनीकडे ६७५ रुपयांची दंड रक्कम मागितली

मानसरोवरकडे जात असताना टीसीने या विद्यार्थिनीकडे ६७५ रुपयांची दंड रक्कम मागितली. तिने साध्या मोबाइलवरून वडिलांशी संपर्क साधला. वडिलांनी रेल्वेचे अधिकृत देयक असल्यास ते भरण्याची तयारी दर्शवली. तसेच संबंधित कर्मचाऱ्याशी बोलून अधिकृत पद्धतीने पैसे भरण्याची विनंती केली, असे सांगितले. मात्र, संबंधित कर्मचाऱ्याने फोनवर बोलण्यास नकार दिल्याचा आणि आपली ओळख स्पष्ट न केल्याचा आरोप पालकांनी केला आहे. संबंधित कर्मचारी राजेंद्र त्रिभुवन असल्याचे त्यांना नंतर समजले. आई येत असल्याची माहिती रेल्वे कर्मचाऱ्यांना देऊन मुलीला मानसरोवर येथे उतरू देण्याची विनंती केल्याचा दावा पालकांनी केला. मात्र, तिला पुढे पनवेलपर्यंत नेण्यात आल्याचा आरोप पालकांनी केला आहे.

पालकांशी कठोर शब्दांत संवाद

पनवेल येथे महिला आरपीएफ कर्मचारी आली. तिची ओळख सांगण्यास सुरुवातीला नकार देण्यात आल्याचा आणि वडिलांशी कठोर भाषेत संवाद झाल्याचा आरोप पालकांनी केला. संबंधित महिला कर्मचारी त्रिशुला धुमाळ असल्याचे नंतर समजल्याचे त्यांनी सांगितले.

Maharashtra TimesMaharashtra Rain News : बाप्पाच्या आगमनापूर्वी मुंबईत धो-धो पाऊस, 20 जिल्ह्यांना ऑरेंज-यलो अलर्ट, राज्यातला शेतकरी सुखावला; हवामान विभागाचा अंदाज

आरपीएफच्या उपस्थितीत सुपूर्द

मध्य रेल्वेने याबाबत चौकशी केली. ‘संबंधित तिकीट तपासणी कर्मचारी अधिकृत ड्युटीवर होता. विद्यार्थिनी एसी लोकलच्या तिकीटाशिवाय प्रवास करत होती. यासाठीचा दंड एचएचटी क्यूआर प्रणालीद्वारे घेण्याचा प्रयत्न झाला; मात्र पेमेंट पूर्ण झाले नाही. पनवेल येथे महिला आरपीएफ कर्मचाऱ्यांना माहिती देण्यात आली. पनवेल येथून ती महिला आरपीएफ कर्मचाऱ्यांसोबत होती. ती अल्पवयीन असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर वडाळा रोड येथे रेल्वे कर्मचारी व आरपीएफच्या उपस्थितीत तिला सुरक्षित सुपूर्द करण्यात आले’, असे मध्य रेल्वेतर्फे सांगण्यात आले.

प्रशांत पाटील

लेखकाबद्दलप्रशांत पाटीलप्रशांत पाटील ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन'(TIL) या आघाडीच्या डिजिटल माध्यम समूहात सीनियर डिजिटल कंन्टेट प्रोड्युसर पदावर कार्यरत आहेत. पुणे जिल्ह्यातील नामांकित ‘थोडक्यात’ न्यूज वेब पोर्टल, हैदराबादमधील ‘आधान शॉर्ट न्यूज अॅप’, ‘सकाळ मिडिया ग्रुप’ आणि आता ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’, असा जवळपास पाच ते साडेपाच वर्षांपेक्षा अधिक काळ ते कार्यरत आहेत. प्रशांत पाटील यांना महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील सर्व गुन्हेगारी, अपघात, शेतकरी विषयक बातम्या, ग्रामीण भागात यश संपादन केलेल्या तरुणी किंवा तरुणांच्या सक्सेस स्टोरीज् आणि महाराष्ट्र हायपर लोकल अशा विविध विषयांची आवड आहे. ऑगस्ट (2026) पासून ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन’साठी (TIL) काम करत आहेत. या दरम्यान, राज्यातील विधानसभा, लोकसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकींच्या बातम्यांवर विशेष लक्ष ठेवतात. याआधीही त्यांनी याच माध्यम समूहासोबत तीन वर्ष काम केलं आहे.

प्रशांत पाटील यांनी पुण्यातील नामांकित आबासाहेब गरवारे महाविद्यालयातून मास कम्युनिकेशन विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. शिक्षण घेत असतानाच त्यांनी ‘थोडक्यात’ या न्यूज वेब पोर्टलला काम केलं. तिथे डिजिटल माध्यमासाठी लेखन करत असताना त्यांना डिजिटल क्षेत्रातलं कसं काम करतात? हे यश संपादन केलं. त्यानंतर त्यांना मुंबईत ‘महाराष्ट्र टाइम्य ऑनलाईन’ (TIL) या नामांकित माध्यम समूहामध्ये काम करण्याची संधी मिळाली. 28 मार्च 2022 रोजी ते ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ या मोठ्या ब्रँण्डसोबत पहिल्यांदा जोडले गेले. तिथे त्यांनी प्रदीर्घ काळ म्हणजे तीन वर्ष डिजिटल विभागात काम केलं. त्यांनतर त्यांनी फेब्रुवारी 2025 ला ‘सकाळ मिडिया ग्रुप’ला काम करण्याची संधी मिळाली. परंतु तिथे ते काम करत असताना त्यांना पुन्हा ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ (TIL) या माध्यम समूहाने संधी दिली. त्यानंतर ऑगस्ट 2026 पासून प्रशांत पाटील हे ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’सोबत (TIL) काम करताय.

‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’मध्ये (TIL) काम करताना त्यांना खूप मोठमोठ्या संध्या मिळाल्या. जसे की, व्हिडिओ करणे, महाराष्ट्रातील संपूर्ण जिल्ह्यातील रिपोर्टर यांच्याशी समन्वय साधणे, जिल्हा प्रतिनिधींकडून वेळोवेळी काम करुन घेणे, विशेष आणि काही महत्वाच्या बातम्या मागवून घेणे, अशा बऱ्याच गोष्टींची त्यांना इथे मिळाली. प्रशांत पाटील हे सकाळच्या शिफ्टला काम करत असताना लाईव्ह ब्लॉग, रिपोर्टरशी बोलणे, ब्रेकिंग बातम्या, हायपर लोकल बातम्या, ग्रामीण भागातील सर्व घडामोडींकडे लक्ष देण्याचं काम ते करतात.… आणखी वाचा