मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ निवासस्थानी पुन्हा एकदा कौटुंबिक भेटीने रंगत वाढली. उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे आणि रश्मी ठाकरे यांनी राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ निवासस्थानी पोहोचून बाप्पाचं दर्शन घेतलं. तर खलीबली कुठे गेले असं म्हणत राज ठाकरेंनी तेजस ठाकरेंची विचारपूस केली. विशेष म्हणजे, यावेळी राज ठाकरे, उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे हे तिघेही पिवळ्या सदऱ्यात दिसून आले. त्यामुळे शिवतीर्थावरील हा ‘यल्लो लूक’ चर्चेचा विषय ठरला.